Maharashtra Civic Bypoll Results 2020: नाशिक, नागपूर, मालेगाव, मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकींचा निकाल इथे पहा लाईव्ह!

दरन्यान काल या पोटनिवडणूकींसाठी मतदान पार पडले आहे.

Counting of votes underway | Representational Image | (Photo Credits: PTI)

Nagpur, Nashik, Malegaon Municipal Corporations Results:  महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर, मालेगाव महानगरपालिकांमधील पोटनिवडणुकींचा आज (10 जानेवारी) निकाल जाहीर केला जाणार आहे. दरन्यान काल या पोटनिवडणूकींसाठी मतदान पार पडले आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून थोड्याच वेळात मतमोजणीचा निकाल हाती येण्यास सुरूवात होणार आहे. या निकालांंचे अपडेट्स तुम्हांला एबीपी माझा, टीव्ही 9 या आघाडीच्या वृत्तवाहिनीवर निकाल पहायला मिळतील.

नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 26 मधील प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी निवडणूक झाली आहे. तर मालेगावमध्ये JDS नेते बुलंद इक्बाल (Buland Iqbal) यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. नागपूरमध्ये 12-D या प्रभागासाठी पोटनिवडणूक झाली आहे. तर मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे अल्ताफ काझी, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

ABP Majha 

TV9 Marathi 

दरम्यान महाराष्ट्रामध्ये नुकताच जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता मुंबई सह महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या पोटनिवडणूकींचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif