नाशिक: आरतीला आले अन कारवाई करुन गेले; आयुक्त मुंढेंच्या 'सर्जिकल स्ट्राईकने' प्रसाद विक्रेते गर्भगळित

मंदिर परिसरातील प्रसाद स्टॉलवर प्लास्टिकविक्री आणि त्याचा वापर सर्रासपणे केली जात आहे. हे पाहून आयुक्त चांगलेचत चिडले. त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला.

महापालिका आयुक्त तुकारमा मुंढे

आयएएस अधिकारी असलेले नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणजे एक धडाकेबाज व्यक्तिमत्व. अर्थात, त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे त्यांची कारवाईसुद्धा धडाकेबाजच असते. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच नाशिककरांना त्याची प्रचिती आली. आयुक्त तुकारम मुंढे हे कालिका मंदिरात आरतीला आले. त्यांनी देवीची मनोभावे आरती केली. पण, परत जाताना मंदिर परिसरातील स्टॉलधारकांना चागलाच प्रसाद दिला. राज्यात प्लास्टिकबंदी आहे. मात्र, मंदिर परिसरातील प्रसाद स्टॉलवर प्लास्टिकविक्री आणि त्याचा वापर सर्रासपणे केली जात आहे. हे पाहून आयुक्त चांगलेचत चिडले. त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला. आयुक्तांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे स्टॉलधारक मात्र चांगलेच गर्भगळित झाले.

आयुक्त मुंढेंनी मंदिर परिसरात प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या सर्व प्रसाद स्टॉल्सची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी अचानक केली. या वेळी त्यांना राज्यभरात बंदी असतानाही इथे प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे आढळले. त्यामुळे भडकलेल्या मुंढे यांनी संध्याकाळपर्यंत प्लॅस्टिकची विक्री आणि वापर त्वरीत बंद करा. अन्यथा, दुकानेच हटवू. तसेच, मंदिर परिसरात अतिक्रमण केल्यासही कारवाई करु असा सज्जड इशारा दिला. आयुक्तांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे स्टॉलधारक मात्र चांगलेच गर्भगळित झाले.

कालिका माता म्हणजे नाशिकची ग्रामदेवता. अवघे नाशिककर कालिका मातेच्या मंदिरासाठी भक्तीभावाने येतात. दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाने आयुक्त मुंढे यांना कालिका मातेच्या आरतीसाठी निमंत्रण दिले. निमंत्रणाचा आगत्याने स्वीकार करत मुंढे यांनी आरतीला हजेरीही लावली. सकाळी ८.३० ला ते अरतीसाठी मंदिरात दाखल झाले. मात्र, मंदिरात प्रवेश करतानाच प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांच्या नजरेला पडल्या. त्यामुळे भडकलेल्या मुंढे यांनी स्टॉलधारक आणि प्रशासनाचीही चांगलीच खरडपट्टी काढली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Navi Mumbai Water Cut Update: नवी मुंबई पाणी कपातीसंदर्भात मोठी अपडेट! उद्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का? जाणून घ्या

International Human Trafficking: बनावट नोकरीचे आमिष दाखवून 60 भारतीय तरुणांना प्रत्येकी 1 हजार डॉलर्सना चिनी कंपनीला विकले; पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा पर्दाफाश

Mumbai AC Local Services: उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सुरु करणार 14 नवीन एसी लोकल सेवा; गर्दीच्या वेळी धावणार 2 नवीन गाड्या

Advertisement

Amit Shah Raigad Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर 12 एप्रिलला मुंबई गोवा महामार्ग 'या' वाहनांसाठी बंद

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement