Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये कोण उधळणार गुलाल? हेमंत गोडसे- राजाभाऊ वाजे यांच्यात चुरशीची लढत

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही क्षणांआधी शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडून दावा ठोकण्यात आला होता.

Photo Credit- Facebook

Nashik Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) उमेदवाराबाबत संस्पेंस राखल्यामुळे नाशिक मतदार संघ चांगलाच चर्चेत आला होता. महायुतीकडून (Mahayuti) अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत गोडसे यांची लढत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)चे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्यासोबत होत आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार म्हणून शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj)निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

हेमंत गोडसे-

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांनी 2019 मध्ये सलग दुसर्‍यांदा विजयी होऊन नाशकात पुन्हा निवडून न येण्याची मालिका खंडित केली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. तर माणिकराव कोकाटे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीकडून पवार यांनी निवडणूक लढवली होती. हेमंत गोडसे यांना 5, 63, 599 मते मिळाली होती. समीर भुजबळ यांना 2,71, 395 मते मिळाली होती. माणिकराव कोकाटे यांना 1,34,527 मते मिळाली होती. तर पवन पवार यांना 1,09,981 मते मिळाली होती.

राजाभाऊ वाजे-

राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2014 साली ते सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते. त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून १९६७ साली निवडून आल्या होत्या. तसंच राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील २००९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif