Nashik ITI Co-director Arrested: नाशिक आयटीआय सहसंचालक अनिल जाधव यांना लाच प्रकरणात अटक, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई लाचलुचपत विभागाने (ACB) ही कारवाई केली.
नाशिकचे (Nashik) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक (Nashik ITI Co-director) अनिल मदन जाधव यांना तब्बल पाच लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी (Bribery Case) अटक करण्यात आली आहे. मुंबई लाचलुचपत विभागाने (ACB) ही कारवाई केली. एसीबीच्या पथकाने सहसंचालकांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तब्बल 1 कोटी 61 लाख रुपयांची मालमत्ता आढळून आली. जी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवघ्या नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. अनिल जाधव यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मुंबई लाचलुचपत विभागाला तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाली होती की, या तक्रारीत म्हटले होते की, तक्रारदाराने राज्य कौशल्य विकास मंडळ येथे अॅकॅडमी व त्याअंतर्गत कोर्सच्या मंजुरीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात सहसंचालकांनी त्रुटी काढल्या होत्या. तक्रारदार हे टेंडर स्किल इंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अॅकॅडमीमध्ये भागीदार आहेत. सहसंचालकांनी काढलेल्या त्रुटी दूर करत तक्ररदारांनी पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांसह नव्याने अर्ज सादर केला. मात्र, सर्व पूर्तता झाल्यावर जाधव यांनी तक्रारदाराकडे तब्बल साडेपाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे जाधव यांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने तक्रार केली. ही तक्रार संबंधित विभागाकडे 7 डिसेंबर 2021 रोजी तक्रार प्राप्त झाली. (हेही वाचा, PMC: पुणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले)
छाप्यात काय काय सापडले?
- 572 सोन्याची नाणी, बिस्किटे आणि दागिने- 79,46,745 रुपये
- बेहिशेबी रोख मालमत्ता- 79,63,500 रुपये
- एकूण मालमत्ता- 01,61,38,000 रुपये
लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत आरोपीने तक्रारदाराकडून 14 डिसेंबर रोजी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबी विभागाने रंगेहात पकडले. . खेरवाडी, वांद्रे येथील शासकीय तंत्र निकेतन परिसरातील कार्यालयात हा सापळा लावण्यात आला होता. ज्यात प्रभारी संचालक अलगतच सपाडले. सहसंचालक अनिल जाधव यांच्याकडेराज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकपदाचा पदभार सोपविण्यात आला होता.