Greta Thunberg, Vidrohi Sahitya Sammelan: विद्रोही साहित्य संमेलन उद्घाटनास ग्रेटा थनबर्ग नाशिकला येणार?
नाशिक येथे भरणाऱ्या 16 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास ग्रेटा हिला निमंत्रीत करावे अशी सूचना काही कार्यकर्ते आणि आयोजक करत आहेत. ही सूचना मान्य केली आणि ग्रेटाने हे निमंत्रण स्वीकारले तर ती नाशिकमध्ये कार्यक्रमास हजर राहू शकते.
नाशिक (Nashik) येथे पार पडणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलन (Vidrohi Sahitya Sammelan) उद्घाटन कार्यक्रमासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greata Thunberg) नाशिक येथे येण्याची शक्यता आहे. नाशिक येथे भरणाऱ्या 16 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास ग्रेटा हिला निमंत्रीत करावे अशी सूचना काही कार्यकर्ते आणि आयोजक करत आहेत. ही सूचना मान्य केली आणि ग्रेटाने हे निमंत्रण स्वीकारले तर ती नाशिकमध्ये कार्यक्रमास हजर राहू शकते.
येत्या 14 फेब्रुवारीला आयोजकांची एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ग्रेटा थनबर्ग हिला विद्रोही साहित्य संमेलन उद्घाटन कार्यक्रमास बोलवायचे किंवा नाही याबाबत निर्णय होणार आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला ग्रेटाने ट्विट करुन पाठिंबा दिला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे आणि नागरिकांच्या भावना भडकावणे या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या Greta Thunberg विरोधात दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल)
विद्रोही साहित्य संमेलनाबाबत एक बैठक मुंबई येथील हुतात्मा स्मारक परिसरात काल (रविवार, 7 फेब्रवारी) पार पडली. या बैठकीत संमेलनाचे स्वरुप, विषय आणि नियोजन यावर चर्चा झाली. तसेच, संमेलन योग्य पद्धतीने पार पडावे यासाठी विविध समित्या कशा स्थापन करायच्या याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ग्रेटा थनबर्ग यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या बैठकिसाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी गणेश उन्हवणे, , चंद्रकांत भालेराव, सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, राजू देसले, मन्सारान पवार, नितीन रोठे,प्रभाकर धात्रकव्ही. टी. जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2021 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

