नाशिक: चोरीच्या गुन्ह्याखाली संशयित म्हणून अटक केलेल्या सराफाने केली आत्महत्या, पोलिसांची नजर चुकवून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
नाशिकमधील सराईत गुन्हेगार हैदराबादमध्ये जाऊन चो-या करायचा. चोरी केलेले काही दागिने त्याने नाशिक मधील विजय बिरारीस विकल्याचे सांगितले. त्यावरुन हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली होती.
संशयास्पद व्यक्ती म्हणून नाशिक (Nashik) मध्ये केलेली कारवाई हैदराबाद पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. येथील एका संशयिताला चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यासाठी हैदराबाद पोलीस गेले असता, पोलिसांची नजर चुकवत सराफ व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्या धक्कादायक घटना नाशिक मधील शासकीय विश्रामगृह येथे घडली आहे. विजय बिरारी असे त्याचे नाव आहे. नाशिकमधील सराईत गुन्हेगार हैदराबादमध्ये जाऊन चो-या करायचा. चोरी केलेले काही दागिने त्याने नाशिक मधील विजय बिरारीस विकल्याचे सांगितले. त्यावरुन हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली होती.
नाशिकमधील एक सराईत गुन्हेगार हैदराबाद मध्ये जाऊन चोरी करत होता. तेथील पोलिसांनी सापळा रचून त्याला हैदराबाद येथून अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने नाशिक मधील सराफास विकल्याचे सांगितले. त्याच्या माहितीनुसार, हैदराबाद पोलिस विजय सराफास अटक करण्यासाठी गेले. मात्र त्याने पोलिसांची नजर चुकवत शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- मुंबई: अभिनेत्री प्रज्ञा पारकर ने पोटच्या मुलीची हत्या करुन केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या पथकातील पाचजणांना ताब्यात घेतले आहे. विश्रामगृहात बिरारी यांच्याशी कोणती चर्चा झाली, त्यांनी तणावातून आत्महत्या केली की दुसर्या कोणत्या कारणाने, याबाबत आता नाशिक पोलीस तपास करत आहेत.
याच हैदराबाद पोलिसांनी डिसेंबर 2019 मध्ये हैदराबाद मध्ये झालेल्या वेटनरी महिला डॉक्टरचा सामूहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळणा-या नराधमांची एन्काऊंटर केला होता.