Nashik Bus Accident: नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी ट्रक चालकास अटक तर दोघांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

या अपघातात संबंधी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन बसला धडक देणाऱ्या ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.

नाशकात काल पहाटेच्या सुमारास एका खासगी बसचा ट्रकला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात बसचा स्फोट (Nashik Bus Fire) होवून बस जळून खाक झाली आहे. तरी या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 11 प्रौढ तर एका चिमुकल्याचा समावेश आहे. घडलेल्या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात याव्या तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनास दिले होते. तरी या प्रकरणी पोलिसांनी दुर्घटनेच्या 24 तासांचं मोठी कारवाई केली आहे.  खासगी बसला धडकणाऱ्या ट्रकचा शोध घेत पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.

 

दरम्यान या अपघातात संबंधी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन बसला धडक देणाऱ्या ट्रक चालकास (Truck Driver) अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकाचे नाव रामजी यादव (Rmaji Yadav) असुन तो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक (Nashik) विभागातील आडगाव पोलिसांनी रात्री उशिराही कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणी दिपक शेंडेंवरही (Deepak Shende) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे ही वाचा:-Nashik Bus Accident: नाशिक बस दुर्घटनेत केंद्र सरकारकडून 2 लाखांच्या मदतीची घोषणा तर राज्य सरकारकडून मोफत इलाजासह 5 लाखांच्या मदत जाहीर)

 

या अपघाता संदर्भात पोलिस पुढील तपास करीत आहेत. तरी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 38 प्रवाशांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात ग्रस्तांना राज्य सरकारकडून (State Government) 5 लाख तर केंद्र सरकारकडून (Central Government) 2 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.