नाशिक: घोटी येथील कृषी प्रदर्शनात 20 जणांच्या टोळक्याकडून तरुणाची भोसकून हत्या

त्यानंतर या टोळक्याने घोटी कृषी प्रदर्शनात प्रवेश करत या तरुणावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या गटातील तरुण हे खंबाळे येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हत्या करण्यात आलेला तरुण हा देवळाली येथील आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

नाशिक (Nashik) येथील घोटी येथे आयोजित कृषी प्रदर्शनात (Agricultural Exhibition in Ghoti) एका 15 ते 20 जणांच्या टोळक्याने एका तरुणाची लाठी, काठी, लोखंडी रॉडने मारहाण करत आणि चाकूने भोसकत एका तरुणाची हत्या केली आहे. विनोद तोकडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले अनेक लोक इथे उपस्थित होते. या लोकांच्या उपस्थितीतच या टोळक्याने या तरुणावर हल्ला केला. विशेष म्हणजे ही घटना घडत होती तेव्हा पोलीसही घटनास्थळी हजर होते.

प्राप्त माहितीनुसार घोटी परिसरात दोन गटांमध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये खुन्नस देण्यावरुन वादावादी झाली होती. त्यानंतर या टोळक्याने घोटी कृषी प्रदर्शनात प्रवेश करत या तरुणावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या गटातील तरुण हे खंबाळे येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हत्या करण्यात आलेला तरुण हा देवळाली येथील आहे. (हेही वाचा, मुंबई: फोनवर गप्पा मारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या; पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पतीची कबुली)

प्राप्त माहितीनुसार, कृषी प्रदर्शनात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी हल्लेखोर टोळक्यातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या 10 ते 15 असल्याची माहिती आहे. घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे. मात्र, घडलेल्या घटनेमुळे कृषी प्रदर्शन आणि परिसारत एकच खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.