गोवा मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार का?
परंतु या पुलाच्या उद्घाटानाची तारीख पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ठरवणार आहेत. तसेच मोदींच्या सवडीनुसार उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मांडवी नदीवरील पुलाचे उद्घाटन येत्या 12 जानेवारीला करण्यात येणार होते. परंतु या पुलाच्या उद्घाटानाची तारीख पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ठरवणार आहेत. तसेच मोदींच्या सवडीनुसार उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पणजीचे माजी आमदार आणि गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनी शनिवारी मांडवी पुलाच्या (Mandovi Bridge) उद्घाटनाबद्दल सांगितले. त्यावेळी सिद्धार्थ यांनी मोंदींच्या कार्यालयाकडे वेळ मागितली असून येत्या 11 आणि 12 जानेवारी रोजी भाजप (BJP) पक्षाच्या राष्ट्रीय मंडळाची बैठक होणार आहे. तसेच गोव्यातील भाजपचे आमदार ही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 12 जानेवारी रोजी मांडवी पुलाचे उद्घाटन होणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर जानेवारी 2019 पर्यंत मांडवी पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे सिद्धार्थ यांनी सांगितले आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो ही कंपनीकडे या पुलाच्या कंत्राटदाराचे काम सोपवण्यात आले आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून या पुल बांधणीसाठी टीका केली जात आहे.(हेही वाचा-नाकात ड्रीप असताना ही गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून पुलाची पाहणी)
यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या मांडवी पुलाची पाहणी केली होती. तिसरा मांडवी पुल हा पाच किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे उद्घाटनानंतर म्हापसापासूनची वाहाने मडगावच्या दिशेने जाण्यास मदत होणार आहे.