Narayan Rane’s Security: मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय गृह खात्याकडून ‘Z’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था

8 जानेवारी 2021 दिवशी राज्य स्तरावर राजकीय मंडळींना दिल्या जाणार्‍या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर नारायण राणेंची सुरक्षा काढून घेण्यात आली होती

Narayan Rane | Photo Credits: Facebook)

अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली असणार्‍या केंद्रीय गृह खात्याकडून (Ministry of Home Affairs) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना तातडीने झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी त्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. केंद्रीय गृह खात्याने Central Industrial Security Force ला नारायण राणेंचि झेड दर्जाची सुरक्षा करण्याचा निर्णय केला आहे. सध्या पाहता त्यांना असलेला सुरक्षेचा धोका पाहता त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय झाला आहे. ही सुरक्षा त्यांच्यासोबत भारतभर राहणार आहे.

दरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील ठाकरे सरकार मार्च 2022 पर्यंत धोक्यात येईल असं भाकित काही दिवसांपूर्वी वर्तवलं आहे.

नारायण राणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी असताना भाजपा मध्ये आले होते. त्यावेळी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. 8 जानेवारी 2021 दिवशी राज्य स्तरावर राजकीय मंडळींना दिल्या जाणार्‍या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर नारायण राणेंची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यावेळी अनेक भाजप नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असणार्‍या फडणवीसांची सुरक्षा देखीलY-plus with escort' दर्जाची करण्यात आली होती. नक्की वाचा:  Maharashtra Government Decision: राज ठाकरे यांची झेड सुरक्षा, देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी हटवली, चंद्रकांत पाटील , प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात .

नारायण राणे यांची पूर्ण सुरक्षा काढून टाकण्यात आली होती. त्यांच्यासोबत केवळ पोलिस कर्मचारी असतं. मागील काही महिन्यांपासून नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे असा कलगीतुरा पुन्हा रंगताना दिसत आहे. दरम्यान मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध टीका केल्याने त्यांवर क्रिमिनल केस दाखल करण्यात आली होती. राणेंना अटक देखील झाली होती.

सध्या महाराष्ट्रात 4 जणांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. अर 12 जणांना झेड सुरक्षा व्यवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सुरक्षेला एका शिफ्ट मध्ये 17 पोलिस काम करत असतात.