Narayan Rane On Shiv Sena: 'दिल्लीला धडक माराल तर डोके जाग्यावर राहणार नाही', नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका

यावरुनही राणे यांनी टीका केली. महाराष्ट्राबाहेर एक खासदार निवडूण आला आणि शिवसेना दिल्लीत धडक मारण्याची भाषा करत आहे. दिल्लीत धडक माराल तर डोके जाग्यावर राहणार नाही,असेही नारायण राणे म्हणाले.

Narayan Rane (Photo Credit- Credit - Twitter)

धूर न निघणारे फटाके फक्त महाविकासआघाडीच्या (Maha Vikas Aghadi) दुकानात मिळतात, असा टोला लगावत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. या वेळी राणे यांनी महाविकासाघाडी, शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. दादरा व नगर हवेली येथून शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचा विजय झाला. यावरुनही राणे यांनी टीका केली. महाराष्ट्राबाहेर एक खासदार निवडूण आला आणि शिवसेना दिल्लीत धडक मारण्याची भाषा करत आहे. दिल्लीत धडक माराल तर डोके जाग्यावर राहणार नाही,असेही नारायण राणे म्हणाले.

दादरा व नगर हवेली येथून कलाबेन डेलकर निवडूण आल्या. पण, तिथे त्यांचे पती अनेक वेळा निवडूण आले आहेत. तसेच त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडूण आल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेने उगाच श्रेय घेऊ नये. पण, दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची शिवसेनेला सवयच आहे. संजय राऊत हे दिल्लीला धडक मारण्याची भाषा करत आहेत. पण दिल्लीला धडक माराल तर डोके जाग्यावर राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर बिन डोक्याचे संजय राऊत दिल्लीत दिसतील, असेही राणे म्हणाले. (हेही वाचा, Shiv Sena-BJP Alliance: 'पंचवीस वर्षांच्या आमच्या उबवणीचा वेगळाच परिणाम', शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिश्कील टोलेबाजी)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती (Agricultural Development Trust Baramati) कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर टीका करत नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. बारामतीत फुटलेल्या फटाक्याचा धुरही निघाला नाही. धूर न निघणारे फटाके फक्त महाविकासआघाडीच्या दुकानात मिळतात. रात्रिचे काम दिवसा केल्यामुळे असे घडत असावे, अशी टीकाही राणे यांनी केली.

शिवसेनेला केवळ नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळेच 15 खासदार आणि 56 आमदार मिळाले. नाहीतर हे केवळ 8 ते 10 वरच थांबतात. दादरा व नगर हवेली येथून निवडून आलेल्या कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडूण आल्या नाहीत. यांचे 56 मोदींच्या चेहऱ्यावर निवडूण आले आणि गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले. आता दिल्लीला धडका मारण्याची भाषा करतात. आम्ही 303 च्या पुढे आहोत. भाजपकडे बहुमत आहे, असेही ते म्हणाले.

ट्विट

नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने सोडले आहे. ते काहीही आरोप करत आहेत. अधिकाऱ्यांवर आरोप करतात. भाजपवरही टीका करतात. पण आमच्यावर टीका कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल. पत्रकारांनीही उगाच बाजू घेऊ नये. यांचेही बरेच काही बाहेर निघेल. आता उंबरठ्यावर आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी सूचक इशारा दिला.