Narayan Rane: नारायण राणे यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील लिलावती रुग्णालयात हृदयाशी संबंधित उपचार सुरु
त्यांना मुंबई येथील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital Mumbai) उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या नियमीत वैद्यकीय तपासणीसाठी नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबई येथील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital Mumbai) उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या नियमीत वैद्यकीय तपासणीसाठी नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले होते. त्या वेळी डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबत काही समस्या जाणवल्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्यास सांगितले. त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
नारायण राणे यांच्यावर आजच अँजिओप्लास्टी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानतर त्यांना एक-दोन दिवस रुग्णालयात विश्रांती पूर्ण केल्यानंतर डिस्चार्ज दिला जाईल, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. नारायण राणे हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा व्यापही वाढला आहे. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण हा नेहमीच असतो. त्यात त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय वेगवान असते. त्यामुळे त्यांचे सहकारी आणि हितचिंतक नेहमीच त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगतात. (हेही वाचा, Narayan Rane On Shivsena: नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात, उद्धव ठाकरें अपयशी मुख्यमंत्री)
नारायण राणे हे आक्रमक शैलिसाठी ओळखले जातात. एकेकाळी शिवसेनेत सर्वसामान्य शिवसैनिक असलेल्या नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद आणि मेहनत याच्या जोरावर मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. पुढे शिवसेनेत त्यांचे फारसे जमले नाही. ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, काँग्रेसमध्येही ते फार काळ रमले नाहीत. मग त्यांनी काँग्रेसमधूनही बाहेर पडत स्वत:चा स्वाभिमान नावाचा पक्ष काढला. अल्पावधीतच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन आपला स्वाभिमान पक्षही विलीन केला.