Narayan Rane, नवनीत राणा यांच्या भाषणाची देशभर चर्चा, घ्या जाणून

No-Confidence Motion: मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर नारायण राणे, श्रीकांत शिंदे, नवनीत राणा यांच्या भाषणाची देशभर चर्चा सुरु आहे.

Narayan Rane, Shrikant Shinde,Navneet Rana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Narayan Rane Controversial Statement: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधकांच्या INDIA आघाडीने केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर संसदेचे कनिष्ठ स्भागृह असलेल्या लोकसभेत चर्चा सुरु असताना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाषणे केली. या तिघांच्याही भाषणाची देशभर चर्चा सुरु आहे. खास करुन मंत्री म्हणून राणे यांनी केलेल्या भाषणावर (Narayan Rane On No-Confidence Motion) सर्वाधिक टीका केली जात आहे.

लोकसभेत नेमके काय घडले?

अविश्वास प्रस्तावावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला. या वेळी भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. त्याला शिवसेना (UBT) नेते खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर नारायण राणे बोलण्यासाठी उभा राहिले. या वेळी त्यांची जीभ घसरली.

'तुम्हारी औकात निकालूंगा'

अरविंद सावंत यांना उद्देशून बोलताना राणे यांनी उच्चारलेल्या मराठीमिश्रीत हिंदीचा मराठी भावार्थ पुढीलप्रमाणे, 'खाली बस.. बस खाली. आता जो आवाज येतो आहे तो मांजरीचा आहे... वाघाचा नाही. मी 1966 चा शिवसैनिक आहे. मी जेव्हा पार्टी सोडली तेव्हा 120 लोक पोलीस संरक्षण घेऊन फिरत होते. औकात नाही यांची.. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर बोलण्याची. जर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मदो, अमित शाह यांच्याबद्दल बोललात तर मी तुम्हाला तुमची औकात काढेन.'

व्हिडिओ

श्रीकांत शिंदे यांनी म्हटली 'हनुमान चालीसा'

शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव दरम्यान मणिपूर मुद्द्यावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राचे राजकारण आणि हिंदुत्त्व यावरच अधिक भर दिला. दरम्यान, त्यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित केला. यावर विरोधकांकडून पाठ आहे (चालिसा) का? असा टोला लगावताच त्यांनी सभागृहातच हनुमान चालीसा म्हणण्यास सुरुवात केली. (shrikant shinde hanuman chalisa)

व्हिडिओ

'विरोधकांना केवळ नरेंद्र मोदी यांचा विरोध करायचा आहे'

महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवीनत राणा यांनाही बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी विरोधक मणिपूर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर बोलतात. मात्र हेच लोक राजस्थान आणि महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय, अत्याचाराबद्दल काहीच बोलत नाहीत. संसदेचे अधिवेशन सुरु असताना विरोधी खासदारांचा एक गट मणिपूरला का गेला होता? तेथे जाऊन त्यांना केवळ पीडितांसोबत फोटो काढायचे होते का? इतकेच नव्हे तर अधिवेशनाच्या आगोदरच मणिपूर येथील महिला अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल कसा झाला? हा व्हिडिओ व्हायरल कोणी केला, त्याची चौकशी करावी, असे अजब तर्कट मांडले.

व्हिडिओ

संसदेतील भाषणे आणि महाराष्ट्रातील खासदारांनी लोकसभेत व्यक्त केलेले विचार याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्रतून लोकसभेत गेलेल्या एकापेक्षा एक विचारवंत खासदारांनी आपल्या भाषणांनी एक अमिट ठसा उमठवला आहे. असे असताना महाराष्ट्रातील या नेत्यांनी संसदेत केलेल्या भाषणामुळे सभागृहात अशा पद्धतीने बोलावे का? ही संसदीय भाषा आहे का? असा सवाल देशभरातून उपस्थित केला जातो आहे.