नितेश राणे ची सरकारी कर्मचार्‍यावर चिखलफेक चूकीची; निषेध योग्य पण गैरकृत्याला पाठिंबा नाही : नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

यवेच्या त्रासाचा प्रश्न आणि त्याचा जाब संबंधित व्यक्तीला विचारणं योग्य आहे. मात्र त्यासाठी सराकरी अधिकार्‍याच्या अंगावर चिखल ओतणं हे चूकीचं असल्याची माहिती नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

खासदार नितेश राणे यांनी कोकणातील मुंबई - गोवा हायवेवर असलेले खड्डे आणि प्रवाशांना होणार्‍या त्रासाचा निषेध करता सरकारी अधिकार्‍याला चिखलाची आंघोळ घातली. या प्रकाराचा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकाराचा नारायण राणे यांनीही निषेध केला आहे. नितेश राणे हा नारायण राणेंचा धाकटा मुलगा आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ (Video)

नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हायवे चं काम रेंगाळल्याने त्याचा निषेध करताना सरकारी उपयंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाची बादली पालथी केली. हायवेच्या त्रासाचा प्रश्न आणि त्याचा जाब संबंधित व्यक्तीला विचारणं योग्य आहे. मात्र त्यासाठी सराकरी अधिकार्‍याच्या अंगावर चिखल ओतणं हे चूकीचं असल्याची माहिती नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

नितेश राणे हा आमदार आहे. गडनदी पुलावर शेडेकरांना नेऊन स्वामिमान कार्यकर्त्यांनी काय स्थिती आहे त्याचं दर्शन घडवलं. त्यानंतर अरेरावीची भाषा करत आधी चिखल ओतला आणि त्यानंतर दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now