Narayan Rane On Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यावरून नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'खरी शिवसेना शिंदे गटाची असून येत्या काळात त्यांनाचं धनुष्यबाण मिळणार'
आम्ही गेलो तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मैदानही मिळत नाही. खरी शिवसेना शिंदे गटाचीचं आहे. येत्या काळात त्यांना धनुष्यबाणही शिंदे गटालाचं मिळणार आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Narayan Rane On Uddhav Thackeray: शिवाजी पार्क (Shivaji Park) मध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava) बीएमसी (BMC) ने अद्याप उद्धव ठाकरे तसेच शिंदे गटाला दुजोरा दिलेला नाही. दोन्ही बाजूंच्या अर्जावर बीएमसी संभ्रमात असून निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आम्ही गेलो तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मैदानही मिळत नाही. खरी शिवसेना शिंदे गटाचीचं आहे. येत्या काळात त्यांना धनुष्यबाणही शिंदे गटालाचं मिळणार आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार असल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे बीएमसीला दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडूनही अर्ज आला आहे. शिंदे गट स्वतःला खरा शिवसैनिक सांगून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा दावा करत आहे. याप्रकरणी बीएमसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 5 ऑक्टोबरला विजयादशमीला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या आयोजनावरून अजूनही संभ्रम कायम आहे. (हेही वाचा -Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनावरण केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक घालून शुद्धीकरण)
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नेत्यांची बैठक बोलावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. या भेटीत उद्धव यांनी आपला शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शिंदे गटाला गुंड म्हणत शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे गुंड असल्याचे म्हटले आहे. बैठकीत उद्धव यांनी नेत्यांना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना बोलावून दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यास सांगितले आहे.
दरम्यान, शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, मुंबईत ज्यांना (दसर्यासाठी) मैदान मिळत नाही ते शिवसेनेचे नाव घेत आहेत. आम्ही शिवसेना सोडली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मैदानही मिळत नाहीये. खरी शिवसेना (एकनाथ) शिंदे यांची आहे. येत्या काळात त्यांना मैदान आणि धनुष्यबाणही मिळणार आहे.