Nanded School Sexual Assault: शालेय मुलावर लैंगिक अत्याचार, नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार शाळेत सेवकाचे कृत्य
नांदेड येथील नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानमाता विद्या विहार इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतील सेवकानेच हा अत्याचार केल्याचे कथीतरित्या पुढे येत आहे.
बदलापूर (Badlapur Sexual Assault Case) येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. या प्रकरणानंतर तरी सरकार आणि शालेय प्रशासन जागे होईल, अशी आशा होती. मात्र, नांदेड (Nanded) येथे घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर अद्यापही असे प्रकार सुरुच असल्याचे पुढे आले आहे. नांदेड शहरातील नामवंत समजल्या जाणाऱ्या ज्ञानमाता विद्या विहार (Gyan Mata Vidya Vihar School Nanded) नामक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका मुलावर लैंगिक अत्याचार (School Boy Sexual Assault) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. शाळेत सेवक पदावर काम करत असलेल्या साबसिंग मच्छल (वय-50) नामक व्यक्तीस या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड येथील विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली.
नांदेड येथील नामांकित शाळेत सेवकाकडून लैंगिक अत्याचार
नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानमाता विद्याविहार नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शहरातील मालटेकडी बायपास रोडवर असलेली ही शाळा परिसरात नामवंत म्हणून ओळखली जाते. या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे आणि आजही तितकेच विद्यार्थी शिकतात. याच शाळेत साबसिंग मच्छल नावाचा एक 50 वर्षीय व्यक्ती सेवक पदावर काम करतो. या व्यक्तीने गुरुवारी (6 मार्च) दुपारी इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कथितपणे लैंगिक अत्याचार केला. विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा, Hyderabad: 27 वर्षीय महिला केअरटेकरचे अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली 20 वर्षांची शिक्षा)
काय घडलं नेमकं?
नांदेड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असणारा 10 वर्षांचा मुलगा इतर वर्गमित्रांसोबत गुरुवारी क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळून झाल्यावर तो क्रिकेट कीट शाळेच्या स्टोर रुममध्ये ठेवण्यासाठी गेला असता, स्टोर रुममध्ये आगोदरच असलेल्या सेवकाने त्यास पकडले आणि त्याच्यावर कथीतरित्या लैंगिक अत्याचार केला. थोड्या वेळानंतर शाळा सुटली. पण, त्याच वेळी तो घाबरलेल्या आणि रडवेल्या अवस्थेत असताना एका महिला शिक्षकास आढळून आला. दरम्यान, घरी गेल्यावर त्याने आपल्या आईला घडलेली हाकीकत सांगितली. त्यानंतर पालकांना एकच धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली, असे पोलीस म्हणाले.
सेवकावर कायदेशीर कारवाई
पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलिसांनी गुन्हा दखल केला आणि संशयित आरोपीस अटक केली. रात्री उशीरपर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. अखेर त्याच्यावर पॉक्टो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने हे कृत्य एकट्यानेच केले आहे की, त्यात आणखी काही लोकांचा समावेश आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत
महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)