Nanded Crime: नांदेडच्या किनवटमध्ये शुल्लक कारणावरुन दोन गटात वाद, 11 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

याप्रकरणी किनवट पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले आहेत.

Representational image (Photo Credit- IANS)

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) किनवट (Kinvat) शहरात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. लग्नकार्यात लावण्यात आलेल्या डीजेवरुन दोन गटात वाद झाला. किनवट शहरातील गंगानगर येथे एका लग्नाच्या हळदी कार्यक्रमात गाणे वाजवल्यावरुन दोन गटात तेढ निर्माण होऊन दगडफेक आणि हाणामारी झाली. यात अनेकांचे डोके फुटले असून हाताला मार लागला आहे. याप्रकरणी किनवट पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे, अर्धापूरचे सहपोलीस अधीक्षक गोहर हसन हे किनवट येथे दाखल झाले होते. दोन्ही गटातील 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगानगर येथे लग्न समारंभ पूर्वी हळदीचा कार्यक्रम होता. डीजेवर गाणे वाजणे सुरु होते. तेवढ्यात इस्लामपुरा येथील दहा जण आले आणि गाणे का वाजवत आहेत, असे म्हणताच बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले.

घटना किरकोळ असून शांतता कायम आहे. अफवा पसरवून शांतता भंग करु नये अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.