नांदेड मध्ये लॉकडाउनचा सदुपयोग करत बापलेकाने विहीर खोदली,गावच्या पाण्याची चिंता मिटवली, वाचा या जोडीची अनोखी कहाणी
नांदेड (Nanded) मधील देवाके कुटुंबातील बापलेकाच्या जोडीने लॉकडाउन मध्ये बसून राहण्यापेक्षा आपल्या गावात असणाऱ्या पाणीटंचाईची (Water Crisis) समस्या मिटवण्यासाठी आपल्या घराच्या अंगणात एक 16 फूट खोल विहीर खोदली आहे.
लॉकडाउन (Lockdown) मध्ये घरबसल्या वैतागलेल्या मंडळींना प्रेरणा देईल असे एक काम नांदेड (Nanded) मधील देवाके कुटुंबातील बापलेकाच्या जोडीने केले आहे. लॉकडाउन मध्ये बसून राहण्यापेक्षा आपल्या गावात असणाऱ्या पाणीटंचाईची (Water Crisis) समस्या मिटवण्यासाठी या दोघांनी मिळून आपल्या घराच्या अंगणात एक 16 फूट खोल विहीर खोदली आहे. अलीकडेच त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन विहिरीला मुबलक पाणी लागले आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना आणि अद्याप नांदेड मध्ये पाऊस पोहचला नसल्याने पुढील अनेक दिवस या विहीरेचे पाणी गावकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. विहीर खोदण्याचा निर्णय घेण्यापासून ते आता मिळालेल्या यशापर्यंत या बापलेकाच्या जोडीची अनोखी कहाणी आता आपण जाणून घेऊयात. Lockdown चा 'असा'ही उपयोग! वाशीम जिल्ह्यातील पती-पत्नीने 21 दिवसात खोदली 25 फुटांची विहीर (See Photos)
नांदेड जिल्ह्यातील मुलंझारा या गावात सिद्धार्थ देवके आणि त्यांचे कुटुंब राहते, सिद्धार्थ हे रिक्षाचालक म्हणून काम करायचे सोबत जोडीला त्यांचा स्थानिक बँड पथकातही सहभाग असायचा. दरवर्षी साधारण पणे मे महिन्यात लग्न समारंभ पार पडत असल्याने या व्यवसायातून त्यांना फायदा व्हायचा मात्र लॉक डाऊन मुळे यंदा त्यांची दोन्ही कामं बंद झाली होती. अशावेळी, बसून राहण्यापेक्षा काहीतरी करणे आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. याच वेळी विहीर खोदण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. गावात पाण्याची टंचाई असल्याने बरंच अंतर लांब जाऊन पाणी आणावे लागत होते अशावेळी ही कल्पना सर्वांच्या कामी येणार होती.
PTI ट्विट
दरम्यान, या कल्पनेतून पुढे जाऊन सिद्धार्थ यांनी आपला मुलगा पंकज याच्यासोबत विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. वडील खोदकाम करायचे आणि लेक चिखल बाजूला करायचा असे त्यांचे काम सुरु होते. असं करत त्यांनी तब्बल 16 फुटावर खोदकाम केले. आणि विहिरीला पाणी लागले. आता लहान मुलंही अगदी सहज बादली टाकून काढू शकेल एवढी पाणी विहिरीला लागले आहे.