महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नांदेड जिल्ह्यातील किनवट ते भोकर मधील उमेदवार, महत्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील भेकर मतदारसंघातून जास्तीत जास्त 135 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट असूनही केवळ भाजपने 2 जागा जिंकल्या.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) एकूण 5,534 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील भेकर मतदारसंघातून जास्तीत जास्त 135 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील 9 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. नांदेड जिल्हा औरंगाबाद विभागात येतो आणि हा मराठवाडा प्रदेशाच्या पूर्व भागात आहे. इथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट असूनही केवळ भाजपने 2 जागा जिंकल्या. या जिल्ह्यात- किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नौगाव, देगलूर, मुखेड अश्या 9 विधानसभा सीट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकी 2019 मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत परत आल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी युती केली असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढवत आहेत. भाजपने सेनेबरोबर मतदानापूर्वी युती करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी 124 जागा सोडल्या.

किनवट (Kinwat) विधानसभा मतदारसंघ

राज्यात झालेल्या 2014 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप जाधव नाईक यांनी विजय मिळवला होता. 1990 ची निवडणूक हरल्यानंतर या जागेवर काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही. नाईक यांनी अपक्ष नेते भीमराव रामजी केराम यांचा पराभव केला होता. यंदा 21 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने तीन वेळा आमदार जाधव प्रदीप नाईक यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. नाईक यांना भाजपच्या भीमराव रामजी केराम याचे कडवे आव्हान असेल.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

जाधव प्रदीप नायक, राष्ट्रवादी- 60, 127

रामजी भीमराव, अपक्ष- 55,152

अशोक सूर्यवंशी, भाजप- 18, 695

डॉ. बीडी चव्हाण, शिवसेना- 18, 227

किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नावे इथे पाहा

प्रदिप जाधव, राष्ट्रवादीरामजी भीमराव, भाजप

विनोद राठोड, मनसेसंदीप निखाते,बीएसपी

हदगाव विधानसभा मतदारसंघ

हडगाव विधानसभा मतदारसंघात सहा वेळा कॉंग्रेस आणि शिवसेनेने चार वेळा विजय मिळविला आहे. महाराष्ट्रातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हडगाव विधानसभा मतदार संघातून नागेश पाटील याने विजय मिळवला होता. बहुजन समाज पक्षालाही येथे चांगली मते मिळाली होती. या मतदार संघातून यंदा सेनेचे नागेश पाटील आणि काँग्रेसचे माधवराव पाटील पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. हदगाव मतदार संघातून एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

नागेश पाटील, शिवसेना,- 781, 520

गोणकर माधवकर, कॉंग्रेस- 65,079

बळीराम,भारिप बहुजन फेडरेशन- 22, 904

एस. झाकीर मोहम्मद, बीएसपी-7,669

हदगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

नागेश पाटील, शिवसेना

जावळगावकर माधवराव निवृत्तीराव पाटील, काँग्रेस

रामचंद्र राठोड, बीएसपी

तिवाले गोविंद सोगाजी, रिपब्लिकन बहुजन सेना

नखाते सतवाजी दिगंबर, बहुजन मुक्ती पार्टी

भोकर विधानसभा मतदारसंघ

भोकर विधानसभेवर कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या जागेवर काँग्रेसने आठ वेळा, दोन वेळा अपक्षांनी आणि राष्ट्रवादीने एकदा विजय मिळविला आहे. 2014 च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमित चव्हाण यांनी विजय मिळवला होता. यंदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. चव्हाण यांना भाजपचे श्रीनिवास ऊर्फ बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे आव्हान आहे.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

अमीता चव्हाण, काँग्रेस- 1,00,781

डॉ माधवराव, भाजप- 53,224

बबन रामराव, शिवसेना- 12, 760

धर्मराज देशमुख, राष्ट्रवादी- 7,809

भोकर विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अशोक चव्हाण, काँग्रेस

बापुसाहेब देशमुख गोरठेकर, भाजप

आयलवाड नामदेव नागोराव, अपक्ष

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ

डीपी सावंत यांनी 2009 आणि 2014 मध्ये येथून विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपच्या सुधाकर रामराव यांना पराभूत केले होते. दुसरीकडे, नांदेड विधानसभा जागेचा इतिहास पहिला तर येथे कॉंग्रेसचा चांगला प्रभाव राहिला आहे. 1990 पासून कॉंग्रेस पार्टीने सतत विजय मिळवला आहे. जेएनपी येथे 1985 आणि 1978 मध्ये जिंकला होता. सावंतने रामरावला 7,600 मतांनी पराभूत केले होते. यंदादेखील सावंत यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आणि त्यांना बालाजी कल्याणकर यांचे आव्हान असेल.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

डी पी सावंत, काँग्रेस- 40,356

सुधाकर रामराव, भाजप- 32,754

अब्दुल हबीब अब्दुल रहीम, एआयएमआयएम- 32,333

मीलिंद देशमुख, शिवसेना- 23,103

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

गंगाधर फुगरे, मनसे

प्रकाश बघते, बीएसपी

बालाजी कल्याणकर, शिवसेना

डी. पी सावंत, काँग्रेस

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

मराठवाड्यातील नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्‍हणजे ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 2014 मधून शिवसेनेचे हेमंत श्रीराम पाटील विजयी झाले होते. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या पाटीलने भाजपच्या दिलीप वेंकटराव याला पराभूत केले होते. 2009 मध्ये काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. तर पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 2014 मध्ये पाटील यांनी फार कमी फरकाने विजय मिळवला होता.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

हेमंत श्रीराम पाटील, शिवसेना- 45,836

दिलीप वेंकटराव, बीजेपी- 42, 629

नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

मोहनराव हंबरडे, काँग्रेस

राजश्री पाटील, शिवसेना

विश्वनाथ धोत्रे, बीएसपी

2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा जागांपैकी 122 जागा जिंकूनसर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. महाराष्ट्रात प्रथमच भाजपाने बर्‍याच जागा जिंकल्या. कॉंग्रेस 42 जागांसह तिसर्‍या स्थानावर घसरली. याव्यतिरिक्त, शिवसेना 63 जागांसह दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now