Nanded Crime: क्षुल्लक कारणांवरून तरुणाचे हात कोयत्याने छाटले, आरोपी पसार; नांदेड येथील धक्कादायक घटना

नांदेड येथील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Nanded Crime:  महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यात रागाच्या  निर्घृण कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. केवळ हसला म्हणून एका फळ विक्रेत्यांने तरुणाचे दोन्ही हात छाटले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलीसांना  देण्यात आली. या घटनेअंतर्गत भाग्यनदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी ही घटना घडली आहे. मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या पीडित तरुणाचं नाव आहे. मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे. दिवसाढवळा ही घटना घडली त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण  निर्माण झाले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आले आणि लसूण विक्रीसाठी गेला होता. बुधवारी सकाळी हसण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. भांडण टोकाला गेलं आणि आरोपीने दिवसाढवळ्या तरुणाचे हात कोयत्याने छाटले. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार केला. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

स्थानिकांच्या मदतीने जवळच्या पोलीस  ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले तो पर्यंत आरोपी घटनास्थळा वरून पसार झाला. या घटने अंतर्गत पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलीस ठाण्यात या घटने अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे. परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडीत तरुणाला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.