Nalasopara Tragedy: नालासोपाऱ्यात खाणीतील जलाशयात पाच मुलांचा बुडून मृत्यू, दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरू
अग्निशमन दलाने दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्याच्यासोबत आणखी तीन जण असल्याने त्यांचाही शोध अग्निशमन दलाने संपूर्ण तलावात घेतला.
नालासोपारा पूर्व येथील बंद खाणीत तयार झालेल्या तलावात पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन परिसरात ही घटना घडली. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यासोबत असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच मुले खाण तलावात पोहण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाले. अमित सूर्यवंशी (12 वर्षे) आणि अभिषेक शर्मा (12 वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. (हेही वाचा - UP Shocker: आत्महत्येसाठी तरुण-तरुणीने गोमती नदीत घेतली उडी, जीव वाचवल्यानंतर मच्छिमारांकडून बेदम मारहाण; सुलतानपूरचा व्हिडिओ व्हायरल)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्याच्यासोबत आणखी तीन जण असल्याने त्यांचाही शोध अग्निशमन दलाने संपूर्ण तलावात घेतला. मात्र तिघेही सापडले नाहीत. पाचपैकी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे, त्यानंतर तिघांनीही भीतीपोटी घटनास्थळावरून पळ काढला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. बेपत्ता 3 जणांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळावर नालासोपारा पूर्व संतोषभूवन या परिसरातून 5 मुलांचा ग्रुप आज दुपारी तलावात पोहायला गेला होता. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली होती. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन मुलं बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता मुलं तलावात बुडाली आहेत की घाबरून तेथून पळून गेली आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.सध्या वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून त्या मुलांचा शोध घेतायेत.