Nalasopara Gang Rape: नालासोपारा मध्ये 22 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार; तिन्ही आरोपी फरार
पोलिसांच्या माहितीनुसार, संजू श्रीवास्तव हा एका राजकीय पक्षाशी जोडलेला आहे. नायगाव मध्ये एका चित्रीकरण स्टुडिओ ची युनियन देखील चालवतो. सध्या पोलिस या तिन्ही आरोपींच्या मागावर आहेत.
नालासोपारा (Nalasopara) मध्ये 22 वर्षीय मुलीवर तिघांकडून सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्लॅकमेलिंग (Blackmailing) आणि बलात्कार (Rape) असे दोन्ही गुन्हे आरोपींवर दाखल केले आहेत. पालघर मधील नालासोपारा भागात ही घटना घडली आहे. यामध्ये संजू श्रीवास्तव, नवीव सिंह आणि हेमा सिंह अशी तीन आरोपींची नावं आहेत. सध्या हे तिन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तरूणीला पैसे देण्याचं आमिष दाखवत बोलावले होते. संजू आणि नवीन सिंह यांनी तिला पैशाचं आमिष दाखवलं. त्यानंतर मुलीला पाण्यामधून काही नशेचे पदार्थ मिसळून देत संधीचा फायदा घेऊन बलात्कार केला. नवीन सिंह ने घडला प्रकार कॅमेर्यामध्येही फिल्म केला आहे. या व्हिडिओ वरून तिला ब्लॅकमेल देखील करण्यात आले. नक्की वाचा: Palghar Gangrape Case: पालघर मध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; एक जण अटकेत .
नालासोपारा मध्ये सामुहिक बलात्काराची घटना
Maharashtra | Case registered against 3 people - Sanju Srivastava, Naveen Singh and Hema Singh for allegedly raping a 22-year-old girl in Nalasopara area. The case has been registered on the basis of her statement. The woman alleged that they spiked her drinks after calling her…
— ANI (@ANI) September 25, 2024
नालासोपारा मध्येच काही दिवसांपूर्वी एका 16 वर्षीय मुलीवर देखील असाच सामुहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देखील पोलिस एका आरोपीच्या मागावर आहे तर दुसर्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोक्सो अॅक्ट अंतर्गतही यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या बलात्कार पीडीत मुलीला देखील तिचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल केला जाईल अशी धमकी देण्यात आली होती.
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2024 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

