Nagpur: गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; नागपुरात गुंडांच्या मुजोरीचे ज्वलंत उदाहरण (Watch Video)
आता अशीच एक बाब नागपूर (Nagpur) येथून समोर येत आहे. रविवारी गँगस्टर आकाश चव्हाणने सक्करदरा (Sakkardara) वाहतूक विभागातील हेड कॉन्स्टेबल अमोल चिंतामवार (Amol Chintamwar) यांच्यावर गाडी घालून
याआधी पुण्यात हवालदाराला गाडीच्या बोनेटवरून फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता अशीच एक बाब नागपूर (Nagpur) येथून समोर येत आहे. रविवारी गँगस्टर आकाश चव्हाणने सक्करदरा (Sakkardara) वाहतूक विभागातील हेड कॉन्स्टेबल अमोल चिंतामवार (Amol Chintamwar) यांच्यावर गाडी घालून, त्यांना गाडीच्या बोनेटवरून साधारण अर्धा किलोमीटर फरपटत नेले. नागपुरात गुंडांची मुजोरी किती वाढली आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यानंतर चव्हाण याच्यावर खुनाच्या प्रयत्नासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक आकाश हा एका गुंडाचा साथीदार आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आकाश चव्हाण आपल्या गर्लफ्रेंडसोबत जात असताना गाडीच्या काचा काळ्या असल्याने, सक्करदरा चौकात चिंतामवार आणि त्यांच्या टीमने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाशने त्यांना जुमानले नाही व तशीच गाडी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अमोल यांनी पुन्हा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आकाशने त्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमोल यांनी प्रसंगावधान राखत बोनेटवर उडी घेतली. आरोपी आकाशने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले.
या दरम्यान आकाशने रस्त्यावरील अजून दोन दुचाकींना धडक दिली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे अखेर, चौकात वाहतूक कोंडी व त्यानंतर आकाशला कार थांबवावी लागली. चव्हाण पुढे आयुर्वेदिक लेआउटजवळ गाडी थांबवूपर्यंत अमोल तसेच बोनटवर बसून होते. त्यानंतर चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा: Pune: विनामास्क गाडी चालकाला अडवल्याने पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; गाडी अंगावर घालून बोनेटवरून नेले)
दरम्यान याआधी विनामास्क मोटारचालकाला कारवाईसाठी अडवले असता, गाडीचालकाने वाहतूक हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही गाडीचालाकाने हवालदाराला बोनेटवर 1 किमी फरपट नेले होते.