Nagpur Suicide Case: पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून पतीची आत्महत्या; महिन्याभरापूर्वी झाला होता विवाह

आत्महत्या केलेला मुलगा 26 वर्षांचा आणि महिन्याभरापूर्वी विवाहबद्ध झालेला होता.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

नागपूर (Nagpur)  मध्ये 26 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पत्नीने घटस्फोट मागितल्यामुळे या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. रामटेक नगर येथील अंजनी पोलिस स्टेशन परिक्षेत्रामधील ही घटना आहे. ही घटना सोमवार दुपारची आहे.

आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव Mohit Sukhchand Choudhary आहे. तो

मध्य प्रदेशातील बालाघाट मधील आहे. त्याने भाड्याच्या घरामध्ये सिलिंगला गळफास घेत जीवन संपवलं.

मोहित पेंटर होता. मागील महिन्यातच तो विवाहबद्ध झाला. त्यानंतर हळूहळू त्यांच्या कुरबुरी सुरू झाल्या. सातत्याने त्यांच्यामध्ये वाद होत होते. पत्नी देखील तिच्या माहेरी निघून गेल्याने अखेर मोहितने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान आजकाल ताणतणावातून आत्महत्या करण्यासरख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कालच सायन प्रतिक्षा नगर मध्ये एका 16 वर्षीय मुलाने आई, वडील, बहिणीच्या देखत 5व्या मजल्यावरून जीव दिला आहे. या  आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. पोलिस तपास सुरू झाला आहे.