Nagpur Class 10Th Student: नागपूरात दोन विद्यार्थिनींनी नैराश्यातून आयुष्य संपवलं, दहावीत 71 टक्के गुण मिळूनही विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
नागपूरातील वाडी परिसरातील रामदुलारी पंचम झारीया या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने गळफास लावून केली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेच्या निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परिक्षेत मुलींनी बाजी मारली असून अनेक ठिकाणी मुलींच अग्रेसर दिसून आल्या आहेत. पंरतू नागपुरात या निकालानंतर काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या परीक्षेत हवं असलेलं यश मिळवता आलं नसल्याने नागपूरमधील दोन विद्यार्थिनींने टोकाचं पाऊल उचलं आहे. निकाल लागून 24 तास ही झाले नसताना येथे दोन विद्यार्थिनींनी नैराश्यातून आयुष्य संपवलं आहे.
नागपूरातील वाडी परिसरातील रामदुलारी पंचम झारीया या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने गळफास लावून केली आपलं जीवन संपवलं. तर सक्करदरा परिसरात चेतना भोजराज भोयर हिला 71 टक्के गुण मिळूनही अपेक्षित गुण न मिळाल्याच्या कारणावरून तिने आपलं जीवन संपवलं. या दोन्ही मुलींना परिक्षेत चांगले गुण मिळून देखील त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूरातील वाडी परिसरात आणि सक्कदरा परिसरात या धक्कादायक घटनेने शोकाकुल वातावरण पहायला मिळाले असून या प्रकरणी आता पुढील तपास ही सुरु असून या दहावीच्या निकाला नंतर अनेक नापास झालेल्या विद्र्यार्थ्यांने देखील टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे,