Nagpur Shocker: बलात्कार प्रकरणी साक्ष फिरवण्यास नकार दिला म्हणून गोळी झाडून हत्या; 30 वर्षीय आरोपी अटकेत
भरत याने 3 जणांच्या मदतीने केशवराव यांना साक्ष फिरवण्यास सांगितलं पण ते ऐकत नसल्याचं पाहून राग अनावर झालेल्या भरतने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.
नागपूर (Nagpur) मध्ये नरखेड (Narkhed) तालुक्यातील बेलोना (Belona) गावामध्ये बलात्कार प्रकरणामध्ये साक्षीदाराने आपली साक्ष बदलण्यास नकार दिल्याने त्याला थेट गोळ्या झाडून ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. ठार करण्यात आलेली व्यक्ती 52 वर्षीय केशवराव मस्के आहेत तर आरोपी 30 वर्षीय भरत कळंबे आहे. दोघेही बेलोना गावातील आहेत. Rajasthan Shocker: भुताटकीचा धाक दाखवून तांत्रिकाचा सासू-सूनेवर बलात्कार; राजस्थानची राजधानी जयपूर येथील धक्कादायक प्रकार .
मस्के आणि कळंबे या कुटुंबामध्ये जुना वाद होता. मस्के यांचा शेती आणि दूधाचा व्यवसाय होता. 3 वर्षांपूर्वी भरत कळंबे यांचा भाऊ प्रेमराज कळंबे यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या घटनेचे केशवराव मस्के साक्षीदार होते. न्यायप्रविष्ट असलेल्या या खटल्यामध्ये केशवराव यांच्या साक्षीने प्रेमराजला 10 वर्षांची शिक्षा होणार होती. त्यामुळे त्यांच्यावर साक्ष फिरवण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. केशवराव यांनी दबावाला न जुमण्याचा निर्धार केला. यावरून दूधाच्या विक्रीवरून परतताना भरतने त्यांना गाठलं.
भरत याने 3 जणांच्या मदतीने केशवराव यांना साक्ष फिरवण्यास सांगितलं पण ते ऐकत नसल्याचं पाहून राग अनावर झालेल्या भरतने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.
दरम्यान भरत याच्या विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भरत दुचाकी वरून पळून जात असल्याचं समजताच त्यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली अखेर मोवाडवरून जलालखेडाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी भरतला सापळा रचून अटक केली.