Nagpur Shocker: नागपुरात 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या लहान बहिणीसमोर बलात्कार; गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपयांचे आमिष, गुन्हा दाखल, तपास सुरु

बलात्कारानंतर आरोपीने तिच्या लहान बहिणीला 20 रुपये दिले आणि तिला तोंड न उघडण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.

Rape Representational Image (File Photo)

नागपूरमधून (Nagpur) अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची (Rape) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील पारडी परिसरात रविवारी, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका 9 वर्षाच्या मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. महत्वाचे म्हणजे मुलीवर तिच्या पाच वर्षांच्या बहिणीच्या उपस्थितीत बलात्कार झाला. आरोपीने बहिणीला 20 रुपये देऊन गप्प बसण्याची धमकी दिली. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेचे आई-वडील रोजंदारी मजूर असून घटनेच्या वेळी ते कामावर गेले होते.

अहवालानुसार,. हे कुटुंब महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील असून, तीन महिन्यांपूर्वी ते नागपुरात परतले होते. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा व्यवसायाने मजूर असलेले पिडीत मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. दोन्ही मुली घरात एकट्याच होत्या. रविवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरी येऊन मुलींना त्यांच्या पालकांबाबत विचारणा केली. पालक घरी नसून, आपण एकटेच असल्याचे मुलींनी त्या व्यक्तीला सांगितले. अशा स्थितीत आरोपीने बळजबरीने घरात घुसून 9 वर्षीय पीडितेवर बलात्कार करण्यास सुरुवात केली.

हा सर्व प्रकार पीडितेची लहान बहीण स्वत:च्या डोळ्यांनी पाहत होती. बलात्कारानंतर आरोपीने तिच्या लहान बहिणीला 20 रुपये दिले आणि तिला तोंड न उघडण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. सायंकाळी आई-वडील घरी आले असता त्यांना मोठी मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली, तर लहान मुलीने सर्व प्रकार सांगितला. (हेही वाचा: Palghar Rape Case: चाकूचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; फरार आरोपींचा शोध सुरू)

त्यानंतर पीडितेला घेऊन आई-वडील पोलीस गेले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पीडितेला रुग्णालयात पाठवले, जिथे तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. दोन्ही मुली आरोपींना ओळखत नसल्या तरी, आरोपी मराठी बोलत असून त्याच्या कपाळावर खुणा असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ओळखीच्या व्यक्तीनेच हा प्रकार केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif