Nagpur: अल्पवयीन भाच्यावर मामी भाळली, लैंगिक शोषण करुन क्लिप काढली, धमकीही दिली, गुन्हा दाखल

भाच्याने नकार देताच लैंगिक गैरवर्तनाचा व्हिडिओ काढून लैंगिक संबंधांसाठी दबावही टाकला. नागपूर (Nagpur ) शहरातील पारशिवनी येथे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Boy | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

प्रेमात वेडीपीशी झालेल्या मामीने चक्क भाच्याचेच लैंगिक शोषण (Sexually Abuse) करण्यापर्यंत मजल मारली. भाच्याने नकार देताच लैंगिक गैरवर्तनाचा व्हिडिओ काढून लैंगिक संबंधांसाठी दबावही टाकला. नागपूर (Nagpur ) शहरातील पारशिवनी येथे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 21 वर्षीय मामी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित भाच्याचे वय 16 आहे. नागपूर पोलिसांनी (Nagpur Polic) या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पीडित मुलाचे वडील खासगी नोकरी करतात. मुलाच्या मामासोबत 2020 मध्ये मामीचा विवाह झाला. त्यानंर 26 ऑगस्ट 2020 मध्ये भाचा मामाकडे शिक्षण आणि इतर कारणांसाठी आला. या वेळी मामीचा जीव भाच्यावर अडकला. तिने भाच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर या प्रकारास नकार देताच मामीने भाच्यासोबत लैंगिक गैरवर्तनाचा व्हिडिओही बनवला. मामीच्या लैंगिक छळाला कंटाळून भाचा आपल्या घरी आला. तरीही मामी थांबली नाही. तिने भाच्याच्या फोनवर फोन करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. (हेही वाचा, Aurangabad: दीर-भावजय एकमेकांच्या मिठीत, विषप्राशन केल्याने रस्त्यावर तडफडून मृत्यू, औरंगाबद येथील घटना)

भाच्याला घरी बोलवून त्याच्यावर लैंगिक शोषण करण्याचा मामीचा उद्योग सुरुच होता. दरम्यान, मामीचा तिच्या पतीसोबत म्हणजेच भाच्याच्या मामासोबत वाद झाला. त्यातून ती माहेरी गेली. धक्कादायक म्हणजे माहेरी गेल्यावरही ती भाच्याला फोन करुन बोलवत असे आणि तिथे त्याचे शोषण करत असे. शेवटी मामीचा त्रास असहय्य झाल्याने या मुलाने नातेवाईकाला माहिती दिली. त्यानंतर मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मामीविरोधात तक्रार दिली.

पारशिवनी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन मामीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच ठार मारण्याची धमकी देणे अशा विविध कायद्यांन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महिलेला अद्याप अटक झाली नाही.