Nagpur Mass Suicide Case: नागपूर मध्ये निवृत्त शिक्षकासह घरातील 3 सदस्य आढळले मृतावस्थेत; मुलगा फसवणूकीच्या गुन्ह्यात आल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज

त्यामुळे एकाने उर्वरित तिघांची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Dead-pixabay

नागपूर (Nagpur) मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाच्या घरातील ही घटना असून घरातील सार्‍यांचेच मृतदेह लटकलेले पाहून आजुबाजूच्या भागात हळहळ व्यक्त केली आहे. ही घटना बुधवार 2 ऑक्टोबरची आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजावरून ही सामुहिक आत्महत्या (Mass Suicide) आहे. या घरामध्ये चौघांची स्वाक्षरी असलेली सुसाईड नोट सापडली आहे.

मृतांमध्ये निवृत्त शिक्षक विजय पाचोरी (62), पत्नी मालाबाई (54), मुलगा दीपक (35) आणि गणेश (40) यांचा समावेश आहे. दोन्ही मुलांची लग्न झालेली नव्हती. हे कुटुंब नागपूर मध्ये मोवाड भागात वॉर्ड नंबर 5 मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमार्टम साठी पाठवले आहेत. नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार autopsy report आल्यानंतर ही आत्महत्या होती की खून त्याचा उलगडा होईल असं म्हटलं आहे. Goregaon West Metro station Suicide Case: गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशन वरून रस्त्यावर उडी मारत 22 वर्षीय मुलाचा मृत्यू .

मीडीया रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या केलेल्या कुटुंबामध्ये एका मुलावर cooperative society fraud चा गुन्हा होता. मध्यप्रदेशातील Pandhurna मध्ये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल होता. यामध्ये त्याला अटक देखील झाली होती. महिन्याभरापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार या आत्महत्येमागे हे प्रकरण कारणीभूत असल्याचा उल्लेख सुसाईड नोट मध्ये आहे.

एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा असताना सार्‍या कुटुंबाने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचलले असावे? याचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागे त्यांच्यावर कोणता दबाव होता का? याचा देखील शोध पोलिस घेत असल्याचे ते म्हणाले आहेत.

हत्या आणि आत्महत्याचं गूढ कायम

पाचोरी कुटुंबामधील चार मृतदेहांपैकी तिघांचे हात मागे बांधलेल्या अवस्थेत पण लटकलेले आढळले आहेत. त्यामुळे एकाने उर्वरित तिघांची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इतरांच्या हत्येनंतर स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.