Lockdown In Nagpur: नागपूर मध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दारुच्या दुकानात नागरिकांची धाव, गर्दी झाल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा उडाला फज्जा

परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी रात्री दारुच्या दुकानात मद्यपींची झुंबड दिसून आली. त्यामुळे दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे.

Queue outside a liquor shop | (Photo Credits: PTI)

Nagpur Lockdown: महाराष्ट्रातील नागपूर येथे वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी रात्री दारुच्या दुकानात मद्यपींची झुंबड दिसून आली. त्यामुळे दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. शहरातील कॉटन मार्केट येथे सुद्धा नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केल्याचे दिसले.(Lockdown in Thane: ठाणे शहरातील 11 हॉटस्पॉट ठिकाणामध्ये आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन; केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू)

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने राज्य सरकारकडून गुरुवारी नागपूर मध्ये येत्या 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा म्हणजे भाजीपाल्याची दुकाने, दुध विक्री फक्त सुरु ठेवली जाणार आहेत. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याची माहिती दिली आहे.

नागपूर सिटी पोलीस कमिशनरेट परिसरात पूर्णपणे येत्या 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु असणार असल्याचे नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 13,659 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 56 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 22,52.057 वर पोहचला आहे. त्याचसोबत राज्यात 1,00,240 अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण असून 9913 जणांनी त्यावर मात केली आहे.(Nagpur Lockdown: नागपूरच्या कॉटन मार्केट मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; 15 मार्चपासून कडक लॉकडाऊन)

मात्र गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रीतील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी त्यावेळी असे म्हटले की, चाचण्यांची संख्या कमी झाली असून रुग्णांना ट्रॅक करण्यासह काही प्रमाणात परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर कोरोनाची परिस्थिती गंभीर्याने घ्या त्याचा फायदा घेऊ नका. जर तुम्हाला कोरोनापासून मुक्त व्हायचे असेल तर नियमांचे पालन करा असे ही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे काही ठिकाणी कठोर लॉकडाऊन जाहीर करावा लागेल असे गुरुवारी म्हटले आहे.