Restaurant on Wheels in Nagpur: नागपूर रेल्वे स्थानकात सुरू झालं पहिलं 'रेस्टॉरंट ऑन व्हिल्स'

हलदीराम यांच्याकडून हे रेस्टॉरंट चालवण्यात येत आहे.

Restaurant on Wheels Nagpur | PC: Twitter/ANI

मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हिजन कडून नागपूर रेल्वे स्थानकात पहिले वहिले 'Restaurant on Wheels' सुरू करण्यात आले आहे. रेल्वेचा जुना कोच एका रेस्टॉरंट मध्ये बदलण्यात आला आहे. हलदीराम यांच्याकडून हे रेस्टॉरंट चालवण्यात येत आहे. नागपूर डिव्हिजनच्या मॅनेजर रिचा खरे यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये 'जर या रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही इतर जिल्ह्यांमध्येही असेच रेस्टॉरंट उघडण्याचा विचार करू आम्हांला आशा आहे की लोकांना ही संकल्पना आवडेल.'

'Restaurant on Wheels'ही संकल्पना नॉन फेअर रेव्हन्यू तत्त्वावर चालवली जाते. ज्यामध्ये तुम्ही मालमत्तेची कमाई करू शकता किंवा मालमत्तेचा व्यावसायिक वापर करू शकता त्यामुळे आम्ही कोचचं रूपांतर रेस्टॉरंट मध्ये केले आहे.

ट्रॅक वरून कोच रस्त्यावर आणणं हे एक आव्हान असल्याचं खरे सांगतात. कोविड 19 च्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हे काम सुरू होते. दरम्यान सध्या लोकांना कोच चं रेस्टॉरंट मध्ये करण्यात आलेले हे रूपांतर आवडले आहे. अनेकांनी त्याचं कौतुक केले आहे. 'महाराजा एक्सप्रेस मध्ये बसून जेवण करत असल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. हे देखील नक्की वाचा: मुंबईच्या CSMT स्थानकात आता एअरपोर्ट्सच्या धर्तीवर मध्य रेल्वेचं नवं प्रशस्त Namah LOUNGE! कॅफे सर्व्हिस ते ट्रॅव्हल कीट मिळतात 'या' सेवा! 

मुंबई मध्येही ऑक्टोबर महिन्यात सीएसटीएम रेल्वे स्थानकामध्ये अशाच प्रकारे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू करण्यात आले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हेरिटेज गल्लीजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या प्रवेशद्वारावर आहे. या भोजनालयात एका वेळी 40 लोक जेवण करतील इतकी क्षमता आहे.