Nagpur Suicide Case: नागपुरात दोघांची एकाचवेळी गळफास घेवून आत्महत्या, घटनेमुळे परिसरात खळबळ
नागपुर मध्ये पेंढीर गावात तरुण- तरुणीने एकाच घरात एकाच रस्सीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Nagpur Suicide Case: तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ताणतणाव किंवा एकतर्फी प्रेमात तरुणाई आत्महत्या करत आहे. दरम्यान नागपूर (Nagpur) शहरात प्रेमयुगल तरुणांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात ही घटना घडली आहे. दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेंढरी गावात दोघांनी एकाच घरात गळफास लावला आहे. गौरव बगमारे आणि जान्हवी नायले असे आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणींचे नाव आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याचे माहिती मिळाली. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. दोघांनी गौरवच्या घराबाजूला वापरत नसलेल्या घरात गेले आणि तेथे गळफास घेतला. स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांना माहिती दिली. पोलीसांना घटनास्थळी येवून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतला.
पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही समोर आले नाही. या आत्महत्ये नंतर परिसराक मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्ये विषयी पोलीस संपुर्ण तपासणी करत आहे. गावातील या घटनेमुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलीसांनी या घटनेत लक्ष देवून चौकशी सुरु केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2023 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

