Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना

या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे

Nagpur crime News

Nagpur Crime News: महाराष्ट्रातील नागपूर येथे एका भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.नागपूर येथील पांचगाव येथे झाला आहे. मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. राजू यांच्या मृतदेह विहिरगाव परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटना स्थळी दाखल झाले.  पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात लोकांची गर्दी झाली.  (हेही वाचा - Pune Fire News: वाघोली परिसरातील 12 मजली इमारतीला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली. माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी रुग्णवाहिका आली आणि मृतदेह लोकप्रतिनिधी रुग्णालयात पाठवण्यात आला. हत्येची घटना शहरात पसरल्याने मोठी खळबळ उडाली. राजू यांचा एक धाबा आहे. धाब्यावरील कर्मचाऱ्यांने ही हत्या केल्याचे संशय आला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याने शहरात मोठा बोबाटा झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला आहे. राजकिय वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. राजू डेंगरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा संशय आल्याने पोलिस सर्तक झाले आहे. या प्रकरणात नागपुर येथील कुही पोलिस तपास करत आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणाची माहिती नोंदवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस या प्रकरणात दखल घेत आहे.



संबंधित बातम्या