Nagpur Accident: नागपूरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडींच्या वाहनाचा घात, अपघातात सहा जणांचा मृत्यू

नागपुर शहरात काटोल परिसरात एक भीषण अपघात झाला. क्वॉलीस आणि ट्रकचा धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Accident (PC - File Photo)

Nagpur Accident: नागपुर शहरात काटोल परिसरात एक भीषण अपघात झाला. क्वॉलीस आणि ट्रकचा धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली. क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या रस्त्याने जात होती. तेव्हा ट्रकची जोरदार धडक झाली. एका लग्न समांरभाचा कार्यक्रम आटपून हे घरी जात होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा- नागपूरमधील पांचपावली पुलावर अपघात, टेम्पोची दुचाकीला धडक,

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरवरून क्वालीस गाडी काटोलच्या दिशेने जात होती. अचानक ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धडक इतकी जोरदार होती की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. जखमीला नागपूरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा लग्नाचा कार्यक्रम आपटून आपल्या घरी जात असताना ही दुर्घटना घडली. अजय चिखले (45), विठ्ठल थोटे (45), सुधाकर मानकर (42), रमेश हेलोंडे (48), मयूर इंगळे (26), वैभव चिखले (32) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे.

अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटना स्थळी दाखल झाले. क्वालीस वाहनात अडकलेल्या सर्व मृतांना बाहेर काढण्यात आले. ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement