लज्जास्पद! नागपूर मध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून शेजाऱ्याने केला 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार
नागपूर मधील वाडी या परिसरात एका चार वर्षाच्या चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून एका २५ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी पोलीसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.
नागपूर (Nagpur) मधील वाडी (Wadi) या परिसरात एका चार वर्षाच्या चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिवसागणिक बलात्काराच्या घटनांमधील वाढ बघता आत देशात खर्च महिला आणि त्यातही अल्पवयीन मुली सुरक्षेची आहेत का असा प्रश्न समाजात उभा राहिला आहे. नागपूर मध्ये घडलेल्या या घटनेत भूषण दहत या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तसेच त्याच्या आयपीसी (IPC) कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ANI ट्विट
याविषयी नागपूर पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, 25 वर्षीय भूषण दहत याने पीडित मुलीला काही अश्लील व्हिडीओ दाखवले होते.त्यांनंतर तिच्या बालवयाचा फायदा घेत या नराधमाने माणुसकीला काळिमा फासण्याचे हे काम केले यासंदर्भात माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली तसेच त्याच्यावर आयपीसी तसेच पॉस्क (POCSO) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Kathua Rape-Murder Case: कठुआ बलात्कार-हत्या प्रकरणी 6 आरोपी दोषी, 3 जणांना जन्मठेप तर 3 जणांना पाच वर्षांची शिक्षा
मागील काही दिवसात या प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अलिगढ मध्ये अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या शवाचे छिन्नविछिन्न तुकडे तिच्याच घराबाहेर कचर्यात टाकण्यात आले होते. या घटनेची जखम ताजी असतानाच आता हे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे.