Sharad Pawar On Ajit Pawar: 'ना थकलो आहे न निवृत्त झालोय'; अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाक्याचा पुनरुच्चार करत शरद पवारांनी दिलं अजित पवारांना उत्तर
मला निवृत्त व्हायला सांगणारे ते कोण आहेत? मी अजूनही काम करू शकतो, असा विश्वाही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना ते वयाच्या 82 व्या वर्षीही काम करू शकतात, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. काकांनी निवृत्त होऊन राष्ट्रवादीची धुरा त्यांच्याकडे सोपवण्याची वेळ आली आहे, या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी 'आपण अजून म्हातारे झालेलो नाही' असे ठणकावून सांगितले. तसेच यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाक्याचा पुनरुच्चार केला. 'ना थकलो आहे न निवृत्त झालोय.' मी पक्षासाठी काम करत असून माझ्याकडे कोणतेही मंत्रीपद नाही. मला निवृत्त व्हायला सांगणारे ते कोण आहेत? मी अजूनही काम करू शकतो, असा विश्वाही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा -Devendra Fadanvis On Pankaja Munde: पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या, पक्षातील जेष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील - देवेंद्र फडणवीस)
दरम्यान यावेळी शरद पवार म्हणाले, पक्षाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती बेकायदेशीर असेल, तर प्रफुल्ल पटेल आणि इतरांनी केलेल्या सर्व नियुक्त्याही बेकायदेशीर आहेत. प्रफुल्ल पटेल यांनीच अध्यक्षपदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर माझी एकमताने निवड झाली. अजित आणि इतरांकडून माझ्यावर वैयक्तिक हल्ले भाजपच्या इशाऱ्यावर केले जात असल्याचा आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला.
अजित पवारांवर निशाणा साधत पवार म्हणाले, 'अजित यांना 4 वेळा उपमुख्यमंत्री करण्यात आले, त्यांना मंत्रिपदे देण्यात आली, निवडणूक हरल्यानंतरही प्रफुल्ल पटेल यांना यूपीएमध्ये मंत्री करण्यात आले. पीए संगमा यांच्या मुलीला मंत्री केले पण सुप्रिया यांना नाही. हा राजवंश आहे का? मग अजित म्हणतोय हे चुकीचं आहे.
सेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही, हे अजितांचे म्हणणे चुकीचे आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, हे महत्त्वाचे आहे. मला निवृत्ती घ्यायला सांगणारे ते कोण आहेत. मी या सर्व लोकांना प्रस्ताव दिला. कार्यकर्त्यांनी मला काम करत राहण्याची विनंती केली. मी अजूनही काम करू शकतो, मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, मी पक्षासाठी काम करत आहे. हे सरकार भाजपच चालवणार आहे. बाकीचे दिल्लीच्या आदेशाचे पालन करतील. मी म्हातारा झालो असे म्हणू नका. मी थकलो नाही आणि निवृत्तही झालो नाही.