Nagarpanchayat Election in Amravati Division: अमरावती विभागातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

अमरावती विभागातील तिवसा, नांदगावखंडेश्‍वर, भातकुली व धारणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा या नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपुष्टात आली होती.

Elections | (Photo Credits: PTI)

Nagarpanchayat Election in Amravati Division: अमरावती विभागातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती विभागातील 13 नगरपंचायतींचा तसेच विदर्भातील 3 नगरपरिषद आणि 43 नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, साधारणतः मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील तिवसा, नांदगावखंडेश्‍वर, भातकुली व धारणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा या नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपुष्टात आली होती. परंतु, कोरोना महामारीच्या संकटामुळे या नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता निवडणूक आयोगाकडून कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करत या नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. (वाचा - BAFI Election 2021: आशिष शेलार यांचा पराभव; भारतीय बॉक्सिंग महासंघ अध्यक्ष पदावर अजय सिंग यांची निवड)

निवडणूक आयोगाने अमरावती विभागातील नगरपंचायत व नगरपरिषदांसाठी प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार, 15 फेब्रुवारीस प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार, 15 जानेवारी 2021 ला राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडलं होतं. यात महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात जागा मिळवल्या होत्या.