Tragic Accident in Mumbra: कुत्रा डोक्यात पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; मुंब्रा येथील घटना (Watch Video)

हा कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरुन आपल्या आईसबत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला. या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (Child Fatality Due to Dog ) झाला आहे.

Tragic Accident in Mumbra (Photo Credit- X)

वाचायला आणि ऐकायला काहीशी विचत्री वाटावी अशी घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील मुंब्रा (Tragic Accident in Mumbra) येथे घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन कुत्रा खाली पडला (Dog Falls from Building). हा कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरुन आपल्या आईसबत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला. या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (Child Fatality Due to Dog ) झाला आहे. मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे हा अपघात घडला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

मुलगी ठार, कुत्रा जखमी

पीडिता आपल्या आईसोबत इमारतीखालून पायी निघाली होती. दरम्यान, इमारतीमध्ये असलेल्या सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाने पाळलेला कुत्रा खिडकीतून खाली पडला. कुत्रा अचानक डोक्यावर पडल्याने पीडिता गंभीर जखमी झाली. झालेला आघात तिला सहन झाला नाही. परिणामी मूर्च्छा आल्याने ती खाली कोसळली. दरम्यान, घडलेला प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात आला. ती घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. जमलेल्या नागरिकांनी चिमुकलीला दवाखान्यात नेले. परंतू, डॉक्टरांनी चिमुकलीला उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेत कुत्रा जींवत राहिला मात्र तो गंभीर जखमी झाला. एका प्राणीप्रेमी महिलेने या श्वानाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेले. (हेही वाचा, ‘Dognapping’ in Pune: पुण्यात कुत्रे चोरणारी टोळी सक्रिय; गुजरवाडीत बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी बॉक्सर जातीचा कुत्रा पळवला (Watch Video))

व्हिडिओमध्ये काय दिसते?

घटेनचे ससीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका अरुंद गल्लीतील रस्त्यावर रहदारी आहे. लोक ये-जा करत आहेत. एक मुलगीही एका महिलेसोबत निघाली आहे. ही मुलगी आणि महिला म्हणजेच पीडिता आणि तिची आई. दोघी पाचमजली इमारतीखालून निघाल्या आहेत. दरम्यान, वरुन कुत्रा खाली पडताना दिसतो. कुत्रा थेट डोक्यातच पडल्याने मुलगी जमीनीवर कोसळते आणि बेशुद्ध होतो. वरुन पडलेला कुत्राही काही काळ निपचित पडतो. दरम्यान, काही वेळाने त्याला शुद्ध येते. तो उभा राहतो आणि लंगडत लंगडत कसबाबसा रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतो. (हेही वाचा, Agra Shocker: जिवंत गाडलेल्या व्यक्तीला भटक्या कुत्र्यांनी वाचवले, चार जणांवर गुन्हा दाखल, आग्रा येथील घटना)

व्हिडिओ

ठाणे पालघरमध्ये अपघाताच्या विविध घटना

दरम्यान, पाठिमागच्याकाही दिवसांमध्ये ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यात अपघाताच्या विविध घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात, ठाणे जिल्ह्यात एक होर्डिंग कोसळले आणि त्याखाली किमान तीन वाहने चिरडली. कल्याण परिसरातील सहजानंद चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला

(3 ऑगस्ट) पहाटे पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आणि त्याने पेट घेतला. हायड्रोजन सिलिंडरचे अनेक स्फोट होऊन आग वाहनातून पसरली. ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. गुजरात बाजूला वसईजवळ ही घटना घडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. गुजरातकडे जाणारी वाहने थांबवण्यात आली आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांना मोठा विलंब झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif