Heavy Vehicle Ban On Shilphata Road: शिळफाटा मार्गांवर अवजड वाहनांना दिवसा बंदी, ठाणे-नवी मुंबईतील वाहतूक कोंडी वाढणार?
रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेतच अवजड वाहनांना मुंब्रा बायपास, शिळफाटा येथे प्रवास करता येणार आहे.
ठाणे, नवी मुंबईकरांसाठीचा महत्त्वाचा रोड असलेला शिळफाटा रोडवर (Shilphata Road) नेहमीच चाकरमान्यांसह, लांबून येणाऱ्या प्रवासी बस आणि विकास कामांसाठी वापरली जाणारी अवजड वाहने यांमुळे मोठी वाहतूक कोंडी (Traffic) निर्माण होते. त्यामुळे होणारी कोंडी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही बदल करण्यात आलेत. मुंब्रा बायपास मार्ग (Mumbra Bypass), कल्याणफाटा (Kalyan) आणि शिळफाटा (Shilphata) मार्गांवर अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आली आहे. या मा्र्गावरुन वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी वाहतुक व्यवस्था उपलब्ध करुन दिलेली आहे. (हेही वाचा - Mumbai Police: 'तुमची कार चार्जिंगसाठी नव्हती', पोलिसांकडून 'X' वापरकर्त्याच्या आरोपांचे खंडण)
पुढील दोन महिने वाहतुकीतील हे बदल कायम राहणार आहेत. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेतच अवजड वाहनांना मुंब्रा बायपास, शिळफाटा येथे प्रवास करता येणार आहे. सदर बंदी घातलेली वाहतूक ठाणे-बेलपूर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग या पर्यायांवरून वळवण्यात आलीये. त्यामुळे आता पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 4 ही वेळ देण्यात आलीये. तसेच रात्री 11 ते पाहटे 5 यावेळेत प्रवासाची परवानगी देण्यात आलीये.
उरण जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने मुंब्रा बायपासमार्गे गुजरात, शिळफाटा, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने जातात. या मार्गावर मुंबईतील नोकरदारांची देखील गर्दी असते. गेल्या काही महिण्यांपासून शिळफाटा भागात उड्डाणपूलाचे काम सुरू आहे.