Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 806 जणांना कोरोना विषाणूची लागण; एकूण संक्रमितांची संख्या 86,132 वर
अशाप्रकारे एकूण संक्रमितांची संख्या 86,132 वर पोहोचली आहे. बीएमसी (BMC) याबाबत माहिती दिली. मुंबईमध्ये आज एकूण 933 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज 806 जणांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. अशाप्रकारे एकूण संक्रमितांची संख्या 86,132 वर पोहोचली आहे. बीएमसी (BMC) याबाबत माहिती दिली. मुंबईमध्ये आज एकूण 933 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आज मुंबईमध्ये 985 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण 58,137 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज शहरात 64 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 4,999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजचे हे 64 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत.
यातील 54रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 44 रुग्ण पुरुष व 20 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 40 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 19 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 67 टक्के आहे. 29 जून ते 06 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.58 टक्के आहे. 6 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 3, 63, 120 इतक्या आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुष्पटीचा दर 44 दिवस आहे.
कोरोणाचा धोका लक्षात घेता महानगरपालिकेतर्फे कोरोंना उपचार केंद्रांमध्ये सतत वाढ करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 3,520 बेड्सच्या कोरोना उपचार सुविधांचे लोकार्पण झाले. मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व बीकेसी याठिकाणी ही आरोग्य केंद्रे उभारली आहे. यातील काही बेड्स ठाणे महानगरपालिकेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; राज्यात दिवसभरात 5134 रुग्णांची नोंद, 224 मृत्यू)
दरम्यान, राज्याबाबत बोलायचे तर, महाराष्ट्रात आज 5,134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे व 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2,17,121 वर पोहचली आहे.