IPL Auction 2025 Live

मुंबई शहराची हद्द वाढणार; पालघर आणि अलिबागसह 'या' ठिकाणचे लोकही होणार मुंबईकर

ही मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती, ती आता मंजूर झाली आहे.

MMRDA (संग्रहित-संपादित प्रतिमा)

राजधानी दिल्लीनंतर मुंबई हे देशातीत सर्वात मोठे शहर आहे. दिल्लीला अजून वाढण्यासाठी आजूबाजूला पुष्कळ जागा आहे, मात्र मुंबई ही उभी वाढत असल्याचे दिसत आहे. आता मुंबईच्या हद्दीमध्ये अजून वाढ होणार आहे, हा ठराव मंजूर झाला आहे. मुंबईचा विस्तार हा वसई, पेण, खालापूर, पनवेल, पालघर आणि अलिबागपर्यंत होणार आहे. यामुळे आता या ठिकाणचे लोकही ‘मुंबईकर’ म्हणून ओळखले जातील. त्यामुळे आता मुंबईची लोकलही आता थेट अलोबाग पर्यंत पोहोचणार आहे.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत, मुंबई प्रदेशाची (MMR) हद्द वाढवण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. यामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. चार हजार चौरस किमीच्या परिसराच्या मुंबईचा विस्तार आता तब्बल सहा हजार चौरस किमीपर्यंत झाला आहे. यामुळे मुंबई शहराच्या आसपासच्या परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे.

(हेही वाचा: मुंबईकरांसाठी 'बीएमसी'चा MCGM मोबाईल ऍप, टोल फ्री कॉल आणि whatsapp नंबर, पावसाळ्यात समस्या आल्यास या क्रमांकावर मिळणार मदत)

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा पैसा केवळ मुंबई व ठाण्यात न वापरता आसपासच्या परिसरात वापरला गेला पाहिजे. ही मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती, ती आता मंजूर झाली आहे. यामुळे पालघर, वसई, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग इत्यादी तालुक्यांचे भाग आता मुंबईच्या हद्दीत येणार आहेत. या निर्णयामुळे या ठिकाणच्या अनेक पालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत यांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळणार आहे.