Mumbai Air Quality: मुंबईची हवा बनली विषारी; शहरात 322 एक्यूआयची नोंद
मुंबईत (Mumbai) कोरोनाचे संकट अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर येत आहे.
मुंबईत (Mumbai) कोरोनाचे संकट अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर येत आहे. मुंबईच्या तापमानात आज (शुक्रवार, 12 फेब्रुवारी) घट झाली असतानाच मुंबईची हवा (Air Quality) आजारी पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत आज 311 एक्यूआय हवा गुणवत्ता पातळी नोंदवली गेली आहे, जी अत्यंत वाईट प्रकारात मोडते. यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना प्रदूषणविषयक मास्क वापरणे आणि श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला होता. मात्र, अनलॉकनंतर हळहळू हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा खालावू लागला आहे.
लाकडॉऊननंतर मुंबईच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. दरम्यान, बंद पडलेले कारखान, उद्योग पुन्हा एकदा सुरु झाले आहे. याचबरोबर बांधकाम उद्योगासह इमारतीच्या निर्माणाधीन कामांनी जास्त वेग पकडला आहे. अशा विविध कारणांमुळे मुंबईच्या वातावरणात धुळीच्या कणांची नोंद अधिक होत आहे. ज्यामुळे मुंबईची हवा नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. हे देखील वाचा- Mumbai Local प्रवासासाठी वेळेच्या निर्बंधामुळे व्यावसायिकांकडून कामकाजाच्या वेळेत बदल
एएनआयचे ट्विट-
दरम्यान, दिल्लीतील हवेची गुणवत्ताही अजूनही अत्यंत वाईट श्रेणीत कायम आहे. तर, अहमदाबादमध्ये हवेची गुणवत्ता 'खराब' प्रकारात मोडत आहे.