'परळ टर्मिनल्स' मध्ये आजपासून धावणार 16 नव्या अप आणि डाऊन रेल्वे फेऱ्या, मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी संपूर्ण वेळापत्रक
4 मार्च 2019 पासून परळ टर्मिनल्सवर मध्य रेल्वेच्या 16 अप आणि डाऊन मार्गावर फेऱ्या सुरु आहेत.
Parel Terminus Train Time Table: एल्फिस्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या धक्कादायक दुर्घटनेनंतर परळ (Parel) स्थानकावर गर्दी विभागण्यासाठी नवा पूल बांधण्यात आला. त्यानंतर आता दादर स्टेशनवरील भार कमी करण्यासाठी आता परळ स्थानक टर्मिनल्समध्ये (Parel Terminus) रूपांतरित करण्यात आले आहे. रविवार (3 मार्च 2019) दिवशी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या स्थानकाचे लोकार्पण केले आहे. आज सोमवार, 4 मार्चपासून परळ टर्मिनल्सवर मध्य रेल्वेच्या 16 अप आणि डाऊन मार्गावर फेऱ्या सुरु आहेत.
परळ टर्मिनल्सवरील रेल्वेचं वेळापत्रक
परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांची लोकल चालविण्यात येणार आहे. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल.
परळ भागामध्ये केईएम, ग्लोबल, टाटांचे कॅन्सर उपवारांवरील हॉस्पिटल आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची, त्यांच्या कुटुंबीयांची ये-जा असते. अनेक कॉर्पोरेट ऑफिस देखील या भागात असल्याने चाकरमान्यांना परळ टर्मिनल्स फायद्याचे ठरणार आहे. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत आणि टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल फेर्या परळ टर्मिनसवरून सुटणार आहेत.त्यामुळे दादर स्थानकावरील बराच भार आणि गर्दी कमी होणार आहे.