Mumbai Water Cut Update: मुंबईकरांनो सावधान, शहरात 'या' तारखेपर्यंत प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठी कमी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Mumbai Water Cut Update:  मुंबई शहरात येत्या काही दिवसांसाठी पाणी कपात असणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठी कमी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांसाठी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन पालिकेने केला आहे. (हेही वाचा- बीएमसी कडून मुंबई मधील 22-23 मे दरम्यान ची पाणी कपात रद्द

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात 30 मे 2024 ( गुरुवार ) पासून 5 टक्के पाणी कपात, तर बुधवार 5 जून 2024 पासून 10 टक्क्यांपर्यंत कपात होणार आहे. अपुरा साठा असताना सध्याचा पाणीसाठा शक्य तितका काळ टिकेल याची खात्री प्रशासनाकडून केली जात आहे. आज 25 मे 2024 रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्याब धरणांमध्ये एकूण 1,40,202 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.बीएमसी प्रशासन पाणी साठ्यावर बारिक लक्ष ठेवून आहे. दररोज नियोजनबध्द पध्दतीन पाणीपुरवठा करत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नम्र आवाहन केले आहे. मुंबईकरांनी जास्तीत जास्त पाण्याची बचत करावी, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकाने प्रसासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे. समाधानकारक पाऊस पडे पर्यंत आणि जलाशयामधील पाण्याची पातळी वाढे पर्यत मुंबईकरांना या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे.