Mumbai News: लोकल ट्रेनमध्ये तरुणाने ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू

रेल्वे अधिकारी या घटनेअंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगत आहे.

Drugs In local train PC Twittter

 Mumbai News: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अंमली पदार्थांचे (Drugs) सेवन करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ एका व्यक्तीने कॅमेरात कैद केले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत आहे. ही घटना शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी घडली आहे. ट्वीटर हॅंडल करणाऱ्या वापरकर्त्याने ही घटना उघडकीस आणली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी मुंबई पोलीसांना (Mumbai Police) टॅग केले आहे.  या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली.

चार सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक माणूस काहीतरी ड्रग्ज सेवन करताना दिसत आहे, तर सोबत असलेला दुसरा माणूस त्याला या कृत्यात मदत करताना दिसत आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "@Mumbai_police_ लोकल ट्रेनमध्ये ड्रग्ज घेतले जात आहे. लोकांच्या खिशात अनेक ड्रग्ज आहेत आणि त्यांच्याकडे 6 मुले आणि 1 मुलगी देखील आहे. ते सर्व नालासोपारा स्टेशनमध्ये उतरले आहेत. दिनांक 1/09/2023 वेळ 1: 25 AM रात्री."

ट्विटला तत्काळ प्रतिसाद देत रेल्वे अधिकारी या घटनेअंतर्गत चिंता व्यक्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना टॅग केले, "आवश्यक कारवाईसाठी, संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवले." विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश रेल्वे संरक्षण दलाला (RPF) दिल्याने पुढील कारवाई वेगाने सुरू करण्यात आली. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी अधिकारी आता सक्रियपणे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.