IPL Auction 2025 Live

Parle AC Explosion Fire: एसी स्फोट झाल्याने आग, महिलेचा गुदमरुन मृत्यू; परळ येथील घटना

ही घटना मुंबई येथील विलेपार्ले (Vile Parle East) परिसरात बुधवारी (21 फेब्रुवारी) सकाळी घडली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचा मृत्यू गुदमरल्याने झाला.

Fire Place PC Representative Image PC pexels

एसी स्फोटामुळे (AC Explosion Fire) घराला लागलेल्या आगीत एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई येथील विलेपार्ले (Vile Parle East) परिसरात बुधवारी (21 फेब्रुवारी) सकाळी घडली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचा मृत्यू गुदमरल्याने झाला. स्वरुपा शाहा असे या महिलेचे नाव आहे. विले पार्ले परिसरात एका अपार्टमेंटमध्ये भाड्याचे घर घेऊन ती एकटीच राहात असे. अलिकडेच तिने घरमालकाच्या परवानगीने स्प्लीट एसी बसवून घेतला होता. अधिक माहिती अशी की, एसीचा स्फोट होऊन आग लागली तेव्हा सदर महिला बाथरुममध्ये होती. ज्यामुळे तिला तत्काळ बाहेर पडता आले नाही.

सकाळी सहा वाजता घडली घटना

दरम्यान, स्वरुपा शाहा यांच्या नातेवाईकांनी फ्लॅटमधील तिचे सामान जमा करुन तो खाली करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्राप्त माहितीनुसार शाहा या दक्षिण मुंबई येते नोकरीस होत्या आणि या अपार्टमेंटमध्ये त्या जवळपास 2009 पासून राहात होत्या. अलिकडेच त्यांनी घरमालकाची पूर्वपरवानगी घेऊन घराच्या तळमजल्यावर एसी बसवला होता. घटना घडली त्या दिवशी सकाळी 6 वाजणेच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये कार धुरणाऱ्या एका व्यक्तीने घरातून आणि सोसायटीच्या आवारातून धूर येताना पाहिला. त्यामुळे त्याने तातडीने सोसायटीतील सदस्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्नकेला. कार धुणाऱ्या इसमाचा आरडाओरडा ऐकूण सोसायटीतील नागरिक तातडीने सोसायटी आवारात दाखल झाले. त्यांनी धूर नेमका कोठूण येतो आहे याबाबत माहिती घेतली असता तो स्वरुपा शाहा यांच्या घरातून येताना दिसला.

नागरिकांकडून पाण्याच्या बादलीने आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न

सोसायटीतील नागरिकांनी तातडीने स्वरुपा शाह यांना आवाज देण्यास सुरुवात केली आणि तिच्या घरमालकांनाही संपर्क साधला. त्यांनी तातडीने चावी घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या बाजूला पाण्याच्या ज्वाळा पाण्याच्या बादल्यांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोसायटीतील सदस्यांनी अग्निशमन दलाला संपर्क केला. विले पार्ले पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली आणि स्वरुपा शाह यांना तातडीने कूपर हॉस्पीटलला दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. तिच्या निधनाबद्दल पोलिसांनी तिच्या पुणे येथे राहणाऱ्या बहिणीला माहिती दिली.

पोलिसंनी म्हटले की, आग लागली तेव्हा स्वरुपा शाहा बाथरुममध्ये होत्या. त्यामुळे त्यांना घराला आग लागल्याची माहिती मिळाली नसावी. तसेच, आगीच्याज्वाळाली लागल्या नसाव्यात. मात्र जेव्हा आग पसरली तेव्हा खूप उशीर झाला असावा ज्यामुळे त्यांना बाहेर पडण्याचा मार्गच सापडला नाही. त्यातच धुरामुळे त्यांचा श्वास घुसमटल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा.