मुंबई: पश्चिम रेल्वे सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप
आजही माहिम रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. ज्याचा हजारो मुंबईकरांना फटका बसला.
पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुक्रवारी (8 मार्च) सकाळी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावरील माहीम स्थानकाजवळ (Mahim Railway Station) काही तांत्रिक बिघाड झाला. त्याचा फटका या मार्गावरुन दोन्ही दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर झाला. सध्या वाहतूक सुरु असली तरी, तिची गती धिमी असून, या मार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
शहरातील कोणत्याही मुंबईकराची सकाळ म्हणजे प्रवास, गर्दी आणि धावपळ याचा सामना करणारी. भल्या पहाटे उठून मुंबईकर कार्यालयात पोहोचण्यासाठी धावाधाव करतात. ही धावाधाव करताना सर्वांना अपेक्षीत ठिकाणी पोहोचण्यासाठी शहरातील अत्यंत सुलभ प्रवास म्हणून मुंबई लोकलच योग्य आणि किफायतशीर ठरते. त्यामुळे जवळपास प्रत्येक मुंबईकर लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य देतो. अशात जर काही बिघाडामुळे गाडीचा खोळंबा झाला तर, मुंबकरांना मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना अनेकदा घडतात. आजही माहिम रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. ज्याचा हजारो मुंबईकरांना फटका बसला. (हेही वाचा, खूशखबर! सेंट्रल रेल्वेवरुन लवकरच धावणार 'मुंबई-पुणे-मुंबई' लोकल)
दरम्यान, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक सुरु झालीआहे. अद्याप वाहतूक विस्कळीत आहे. मात्र, लवकरच ती पूर्ववत होईल, असे रेल्वे सुत्रांनी म्हटले आहे.