Mumbai Weather Update: मुंबईच्या तापमानात 35 डिग्री सेल्सिअसची वाढ; उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत सुमारे 30 ते 40 किमी वादळी वारे वाहणार

याशिवाय किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअसवर पोहचले आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असेल. तसेच मुंबईतील सांताक्रूझमध्ये 80% आणि कुलाब्यात 92% इतकी आर्द्रता असणार असेल.

Mumbai Temperature (Photo Credits: Pixabay)

Mumbai Weather Update: मुंबईच्या तापमानात शुक्रवारी 35 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअसवर पोहचले आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) माहिती दिली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असेल. तसेच मुंबईतील सांताक्रूझमध्ये 80% आणि कुलाब्यात 92% इतके आर्द्रता असणार असेल.

याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत वेगळ्या ठिकाणी गडगडाटासह पाऊस आणि वादळी वारे (Thunderstorm) वाहतील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या भागात वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 30 ते 40 किमी असणार आहे. (हेही वाचा - Coronavirus: देशात लॉकडाऊन असताना लोकांनी केला दुधाच्या टँकरमधून प्रवास; रितेश देशमुख ने शेअर केला सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ: Watch Video)

पुणे, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी सकाळपासून येत्या 48 तासांत या भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील धुळे जिल्ह्यापासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंतच्या पट्ट्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीने गुरुवारी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, सांताक्रूझमधील कमाल तपमान 33.1° सेल्सियस तर किमान तापमान 25°C डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. तसेच कुलाबातील कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान 24.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले.