Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज मुंबईत दिवसभर धागाळ आकाशस मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.18 आणि 19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे.
Mumbai Weather Prediction, July 18: हवामान खात्याने मुंबईत आज येल्लो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज मुंबईत दिवसभर धागाळ आकाशस मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.18 आणि 19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. कारण, त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. त्याचबरबोर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.आठवडाभर मुसळधार पाऊस नंतर गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता परंतु पावसानी मात्र हजेरी लावली नाही. शिअर झोनच्या प्रभावामुळे मुंबईत गेल्या 2 दिवसात पाऊस पडला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, आता तो उत्तरेकडे सरकल्याने आज दुपार आणि संध्याकाळपासून पुढील 24 ते 36 तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण मंगळवार, शहर आणि त्याच्या शेजारील जिल्हे ढगाळ वातावरणाने व्यापलेले असतानाही, मुंबईत थोडासा पाऊस झाला नाही आणि IMD च्या सांताक्रूझ स्टेशनवर 1.5 मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबा किनारपट्टी वेधशाळेत सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 दरम्यान 0.8 मिमी पाऊस झाला.RMC मुंबईच्या मते, आर्थिक राजधानीत 19 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहण्याची अपेक्षा आहे. हेही वाचा : Mumbai Rain Alert: मुंबईत पुढील 24 ते 36 तास महत्वाचे; मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
संपूर्ण कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.