Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईचे उद्याचे वातावरण कसेअसेल? जाणून घ्या हवामान अंदाज!

Photo credit pixabay

मुंबई सह देशभर यंदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसाची प्रतिक्षा आहे. कडाक्याचं ऊन, घामाच्या धारा, उष्माघाताचा त्रास यापासून सुटका मिळवण्यासाठी सारेच जण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. यंदा अंदमान आणि केरळ मध्ये वेळेआधीच दाखल झालेला मान्सून मुंबई सह महाराष्ट्राला कधी चिंब करणार? याचे वेध आता लागले आहेत. त्यासाठी हवामान विभागाने मुंबई शहरात उद्याचे हवामान काय असेल याचा पहा काय आहे अंदाज! Mumbai Weather Forecast: मुंबईत पाऊस; शहरात मान्सून पूर्व सरी बरसण्याच्या पार्श्वभूमीवर पहा कसे असेल उद्याचे हवामान!

मुंबई शहरात उद्याचे हवामान काय असेल

 

 

आज हवामान खात्या ने मुंबईत यल्लो अलर्ट जाहीर केला आहे, कारण मुसळधार पाऊसची 80% शक्यता आहे असे सांगितले जात आहे.

The Indian Meteorological Department (IMD) has raised a yellow alert for Mumbai today, signaling an 80% chance of heavy showers.

Read more...https://t.co/w37tCL6Qrd#MumbaiRains #IMD #MaharashtraRains

— Lokmat Times (@lokmattimeseng) June 6, 2024

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,  यंदा महाराष्ट्रामध्ये 5-6 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस राज्यात यंदा दमदार बरसेल असा अंदाज आहे. पावसावर शेतीची कामं अवलंबून असल्याने सध्या शेतकर्‍यांना देखील त्याची प्रतिक्षा आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडल्याने पाणी टंचाई ची समस्या निर्माण झाली आहे सोबतच अनेक ठिकाणी फळबागा देखील पाण्या अभावी  करपून  गेल्याने शेतकर्‍यांना आता वरूण राजावरच अवलंबून रहावं लागत आहे.